22 October 2020

News Flash

लता मंगेशकर यांची इमारत सील, करोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत करोना करोना विषाणूची शिरकाव झाला आहे. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने लता मंगेशकर यांची इमारत सील करण्यात आली आहे. या इमारतीत वयोवृद्ध व्यक्ती आधिक प्रमाणात राहत असल्यामुळे बीएमसीनं खबरदारी म्हणून शनिवारी रात्री ही इमारात सील केली आहे.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मुंबईमधील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच लता मंगेशकर राहत असलेल्या प्रभुकुंज सोसायटीत करोनाचे पाच रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीदेखील राहतात. बीएमसीकडून ही संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज करण्यात येणार आहे. त्याशिवाय सोसायटी परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे.

सोसायटी सील केल्याची बातमी समजताच लता मंगेशकर आणि कुटुंबीयांची विचारपूस करणारे फोन येई लागले. त्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली. यामध्ये त्यांनी लिहलेय, “आम्हाला आज संध्याकाळपासून प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयोवृद्ध रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणं गरजेचं आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 9:14 am

Web Title: lata mangeshkar building sealed due to corona virus patiint nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 ठाणे मेट्रोच्या कारशेडच्या जागेचा तिढा सुटेना
2 मुंबईत आणखी १,४३२ रुग्ण
3 महानिर्मितीत संचालकपदाच्या नियुक्तीची घाई
Just Now!
X