‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजना सुरू

नाना खटाटोप आणि आर्थिक जुळवाजुळव करून घरखरेदी केली जाते, तेव्हा मिळणारे मानसिक समाधान आणि आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. परंतु या आनंदाला दुप्पट करून घरखरेदीवर पर्यटन पॅकेजसह आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी चालून आली आहे. ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ ही योजना सुरू झाली असून या योजनेत भाग्यवंत घरखरेदीदारांना पर्यटन पॅकेजखेरीज एसी, फ्रिज, एलईडीसारखी आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत.

‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेत सहभागी झालेल्या बिल्डरांकडून घर खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी त्याची नोंदणी करायची आहे. त्यानंतर बिल्डरांकडून अर्ज घेऊन तो भरून द्यायचा आहे. ‘लोकसत्ता’ तुम्हाला का आवडतो?’ याबाबतही थोडक्यात माहिती द्यायची आहे. या योजनेच्या सोडतीत भाग्यवान ठरणाऱ्या ग्राहकाला मोफत सहलीचा आनंद घेता येईल. योजनेत सहभागी होणाऱ्या इतर ग्राहकांना एसी, फ्रिज, एलईडीसारखी उपयुक्त व मौल्यवान बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या बिल्डरांची माहिती ‘वास्तुरंग’ पुरवणीमध्ये देण्यात येईल. या स्पर्धेकरिता नियम व अटी लागू आहेत.

प्रायोजक

‘रोसा ग्रुप’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमाचे ‘निसर्ग ग्रुप’ प्लॅटिनम पार्टनर आहेत. ‘ओम श्री साई कृपा कन्स्ट्रक्शन’ हे गोल्ड पार्टनर आणि ‘महालँड’ सिल्व्हर पार्टनर आहेत. ही योजना ‘हावरे ग्रुप’, ‘प्रोजेनेसिस’, ‘निद्रा क्रिएशन’ आणि ‘मोहन ग्रुप’ यांच्यामार्फत पावर्ड बाय आहे. या योजनेचे हार्टकेअर पार्टनर ‘माधवबाग’, वास्तुशास्त्र पार्टनर ‘वास्तु रविराज’, ट्रॅव्हल पार्टनर ‘ईशा ग्रुप’ आहेत.