21 September 2020

News Flash

वकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत!

स्थितीत सुधारणा झाल्यावर वकिलांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल

संग्रहित छायाचित्र

वकील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना उपनगरी रेल्वे (लोकल) प्रवासाची मुभा देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. यासंदर्भातील वकिलांच्या संघटनेचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती सरकारतर्फे शुक्रवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.

सद्यस्थित वकील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करणे शक्य नाही. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या विशेष लोकलमधून प्रवास करण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाला दिली. स्थितीत सुधारणा झाल्यावर वकिलांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:58 am

Web Title: lawyers are not in urgent service right now abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध
2 तंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून
3 प्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली
Just Now!
X