प्रा. बाळ आपटे यांनी विद्यार्थी चळवळीची तर्क शुद्ध मांडणी केल्यामुळे त्यांच्या नावे विद्यापीठात सुरू होणाऱ्या केंद्राच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध अभ्यास व संशोधन केले जाईल’, असा आशावाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केला.

‘विद्यार्थी चळवळीचे तत्त्वज्ञान विकसित करण्यात प्रा. आपटे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी जगभरातील विद्यार्थी चळवळींचा अभ्यास केल्यामुळे चळवळीचा दृष्टिकोन व्यापक असण्यावर कायम भर दिला. राष्ट्रीय युवा धोरणात सर्वसमावेशक बाबींचा अंतर्भाव व्हावा, यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती, असे होसबळे यांनी नमूद केले.

मुंबई विद्यापीठात ‘प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडण्ट्स अ‍ॅण्ड युथ मूव्हमेंट’चे कोनशिला अनावरण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सोमव