19 September 2020

News Flash

अपंग कुत्र्याला मारहाण करुन ठार केल्याने कवी प्रदीप यांच्या मुलीची पोलिसात तक्रार

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे

एका अपंग कुत्र्याला वॉचमनने अमानुष मारहाण करुन ठार केल्याप्रकरणी कवी प्रदीप यांची मुलगी मितुल प्रदीप यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. प्राण्यांविरोधात अमानुषपणा आणि क्रौर्य दाखवल्याप्रकरणी वॉचमनविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. लंगडू नावाचा एक कुत्रा विले पार्ले येथील शिवम सोसायटीजवळ रहात होता. त्याचा दोन पाय जन्मापासूनच अधू होते. तरीही तो त्याचं आयुष्य जगत होता. त्याला जन्मापासूनच पाय नसल्याने त्याचे नाव लंगडू असे ठेवण्यात आले होते. १३ नोव्हेंबरला लंगडूला शिवम सोसायटीच्या वॉचमनने अमानुष मारहाण केली.

लंगडूला एका मोठ्या काठीने त्या वॉचमनने बदडून काढले. लंगडू हा जन्मापासूनच अपंग असल्याने अनेकजण त्याला खायला घेऊन येत. वॉचमनला ही बाब आवडत नसे. त्याचमुळे १३ नोव्हेंबरला या वॉचमनने लंगडूला मारहाण केली. सोसायटीमध्ये राहणाऱ्या सदस्यांनीही या प्रकरणी त्यांची साक्ष दिली आहे. लंगडूला करण्यात आलेली मारहाण एवढी क्रूर होती की त्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर स्व. कवी प्रदीप यांच्या कन्या मितुल प्रदीप यांनी जुहू पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली.

लंगडू म्हातारा झाला होता आणि तो अपंगही होता. विलेपार्ले या ठिकाणी घडलेला हा प्रकार म्हणजे क्रौर्याची परिसीमा आहे असंही मितुल प्रदीप यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. “लंगडूसारखे बळी जातात ही बाब दुर्दैवी आहे. मुक्या प्राण्यांबाबत अशा प्रकारची घटना घडणं चीड आणणारे आहे” असंही मितुल यांनी म्हटलं आहे. तसंच २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवम सोसायटीमधून लंगडूसाठी कँडल मार्चही काढला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 10:50 pm

Web Title: legendary poet late kavi pradeeps daughter mitul pradeep filed an fir today with juhu police station for an animal cruelty case scj 81
Next Stories
1 शक्ती मिल बलात्कार प्रकरणावर आधारीत आहे मर्दानी-2 ?
2 धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची हत्या, बाईकवरुन ९० किमी दूर नेऊन जाळला मृतदेह
3 पीएमसी बँक प्रकरण : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
Just Now!
X