शिवसेनेच्या आमदार  नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

२००२ पासून विधान परिषदेच्या त्या सदस्या आहेत. याशिवाय विविध विषय समित्यांवर देखील त्यांनी काम केल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत.