08 March 2021

News Flash

जकात दलालांच्या धमकीचे पडसाद विधी समितीतही

जकात दलालांनी महापालिकेच्या विधी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मकरंद नार्वेकर यांना महापालिका मुख्यालयात येऊन दिलेल्या धमकीचे परिणाम गुरुवारी विधी समितीच्या बैठकीतही उमटले आणि ही बैठक तहकूब

| May 10, 2013 03:45 am

जकात दलालांनी महापालिकेच्या विधी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मकरंद नार्वेकर यांना महापालिका मुख्यालयात येऊन दिलेल्या धमकीचे परिणाम गुरुवारी विधी समितीच्या बैठकीतही उमटले आणि ही बैठक तहकूब करण्यात आली. शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी सभा तहकुबी मांडली होती. महापालिका विधी समितीच्या अध्यक्षांना महापालिका मुख्यालयात येऊन धमकी देण्यापर्यंत जकात दलालांची मजल गेली असून अधिकारी आणि जकात दलाल यांच्या संगनमताने असे प्रकार घडत आहेत. जकात चोरांचे हे रॅकेट पूर्णपणे मोडून काढावे, असे रहाटे यांनी सांगितले. रहाटे यांनी मांडलेल्या सभा तहकुबीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि या प्रकाराच्या निषेधार्थ सर्वानी सभात्याग केला. अखेर ही बैठक तहकूब करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 3:45 am

Web Title: legislature committee discuss threat to makarand narvekar by octroi agent
Next Stories
1 कंपनीची बस उलटून कर्मचारी ठार
2 आयकर भवनास आग
3 अनधिकृत बांधकामांतील रहिवाशांना पुनर्वसनाचा हक्कच नाही!
Just Now!
X