News Flash

अंधेरीत मरोळमध्ये रहिवाशी सोसायटीत बिबटया शिरल्याने खळबळ

अंधेरीत मरोळमधील विजय नगर येथील वूडलँड सोसायटीत बिबटया आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अंधेरीत मरोळमधील विजय नगर येथील वूडलँड सोसायटीत बिबटया आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबटयाच्या मुक्तपणे सुरु असलेला वावर कैद झाला आहे. वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या बिबटयाला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

वूडलँड ही रहिवाशी सोसायटी आहे. इमारतीच्या जिन्याखाली हा बिबटया लपून बसला होता. जंगलातून भक्ष्याच्या शोधात तो या सोसायटीपर्यंत आल्याची शक्यता आहे. वूडलँड सोसायटीपासून काही अंतरावर संजय गांधी नॅशनल पार्क आहे.

आरे कॉलनीपासून १०० मीटरच्या अंतरावर हा परिसर आहे. बिबटया सोसायटीत शिरल्यामुळे इमारतीमध्ये राहणारे रहिवाशी हादरले आहेत. बघ्यांनी सुद्धा इथे गर्दी केली असून बिबटयाला पकडण्यासाठी वनविभागेच ऑपरेशन सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 2:22 pm

Web Title: leopard has been spotted at woodland crest residential society
Next Stories
1 १.८० कोटी रुपयांना दाऊदची बहिण हसीनाच्या मुंबईतील फ्लॅटचा लिलाव
2 डाऊन प्रवास करणाऱ्यांनो सावधान, होऊ शकतो दंड आणि एक वर्ष कारावासाची शिक्षा
3 ‘डेटिंग अ‍ॅप’द्वारे वृद्धाला ४६ लाखांचा गंडा
Just Now!
X