News Flash

वनाधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन बिबट्या पसार!

आयआयटी मुंबईच्या संकुलातील मेकॅनिकल कार्यशाळेत शिरलेल्या बिबटय़ाला पकडण्यात वनाधिकारी अपयशी ठरले. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, वनाधिकाऱ्यांच्या हातावर तुऱ्या

| July 26, 2014 03:59 am

आयआयटी मुंबईच्या संकुलातील मेकॅनिकल कार्यशाळेत शिरलेल्या बिबटय़ाला पकडण्यात वनाधिकारी अपयशी ठरले. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, वनाधिकाऱ्यांच्या हातावर तुऱ्या देऊन बिबट्या शनिवारी आयआयटीच्या परिसरातून निसटला. त्यानंतर आसपासच्या परिसरात बिबट्या नसल्याची खात्री झाल्यावर वनाधिकाऱ्यांनी मेकॅनिकल कार्यशाळेचा ताबा आयआयटी प्रशासनाकडे सोपवला . बुधवारी सकाळपासून बिबट्या आयआयटीच्या मेकॅनिकल कार्यशाळेत लपून बसला होता. त्या दिवसापासून बिबटय़ाला बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न सुरू होते. अखेरचा उपाय म्हणून एका पिंजऱ्यातून वनकर्मचारी आत पाठवून बिबटय़ाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्नसुद्धा वनविभागाकडून करण्यात येणार होता. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:59 am

Web Title: leopard ran away for mumbai iit
टॅग : Leopard
Next Stories
1 पीपल्स सोसायटीवर प्रकाश आंबेडकरांचे वर्चस्व?
2 मुंबईत लेप्टोचा पहिला बळी
3 ‘आयआयटी’त बिबटय़ाचे ‘प्रशिक्षण’ सुरूच!
Just Now!
X