News Flash

विवाहाच्या आमिषाने बलात्कार

कल्याण पूर्व विभागातील कोळशेवाडीत राहणाऱ्या लोकप्रिय गायक दिवंगत प्रल्हाद शिंदे यांच्या नातवास लग्नाचे आमिष

| September 15, 2013 05:13 am

कल्याण पूर्व विभागातील कोळशेवाडीत राहणाऱ्या लोकप्रिय गायक दिवंगत प्रल्हाद शिंदे यांच्या नातवास लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शनिवारी अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थक शिंदे याने एका तरूणीशी विवाहाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवले होते. त्यातून ती तरूणी गर्भवती राहिल्याने समर्थकने तिच्याशी लग्न केले. मात्र लग्नानंतरही पत्नीला घरी घेऊन जाण्यास तो तयार नव्हता. अखेर तिने याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. समर्थकचा भाऊ सार्थक तसेच वडिल दिनकर आणि आईने घरासाठी पैसे मागितल्याचा आरोपही तिने केला आहे.
याप्रकरणी समर्थक आणि त्याचे वडिल दिनकर यांना अटक करण्यात आली आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 5:13 am

Web Title: let singer pralhad shindes grandson samarthak shinde arrested in rape case
Next Stories
1 टाटा वीज कंपनीत २१ लाखांची चोरी
2 मराठी प्राध्यापकावरील अन्याय अखेर दूर
3 हसन अलीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
Just Now!
X