27 November 2020

News Flash

परीक्षा घेण्याच्या सूचना नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शाळांना पत्र

शासन आदेशाचे उल्लंघन झाल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

शाळांनी पालकांच्या हाती विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांची वेळापत्रके सोपवलेली असताना शिक्षण उपसंचालकांनी मात्र, परीक्षा घेण्याबाबत शासनाच्या कोणत्याही सूचना नाहीत, असे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी शासन आदेशाचे उल्लंघन झाल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही दिली आहे.

ऑनलाइन वर्गामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांचे नियोजन शाळांनी केले आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वी शाळा सत्र परीक्षा घेणार आहेत. त्यासाठी काही शाळांनी शाळेत येऊन प्रश्नपत्रिका घेऊन जाव्यात आणि उत्तरपत्रिका पोहोचवण्यात याव्यात अशा सूचनाही पालकांना दिल्या. परीक्षा घेण्यासाठी शाळांमध्ये शिक्षकांना बोलावण्यात येत आहे. शाळेत न आल्यास वेतन रोखण्याची धमकीही शाळा देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 1:03 am

Web Title: letter from the office of the deputy director of education to the schools stating that there is no instruction to take the examination abn 97
Next Stories
1 ‘सिटी सेंटर’मध्ये अग्नितांडव
2 दुकानांची राखरांगोळी, लाखोंचे नुकसान
3 वातानुकूलित उपनगरी गाडीच्या डब्याला आग
Just Now!
X