25 September 2020

News Flash

‘माझे आयुष्य संपले’ असा संदेश पाठवत मुंबईत व्यापाऱ्याची आत्महत्या

स्वतःच्या वॅगन आर कारमध्ये बंदुकीने गोळी झाडून घेत सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

संग्रहित छायाचित्र

माझे आयुष्य संपले असा मेसेज मित्रांना पाठवत ४० वर्षांच्या सोने व्यापाऱ्याने आपल्या कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आणि आयुष्य संपवले. पोलिसांना मारूती वॅगन आर कारमध्ये या व्यापाराचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका स्थानिक माणसाला मुंबईतील परळ भागातल्या साईबाबा मार्गावर ही कार आढळली. त्यामध्ये या व्यापाऱ्याचा मृतदेह होता. वॅगन आर या त्याच्या कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे ज्या नागरिकाने पाहिले त्याने याबाबतची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांना हा मृतदेह मिळाला त्याच्या बारा तास आधी या व्यापाऱ्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला. अश्विन जैन या सोने व्यापाऱ्याकडे त्याच्या वडिलांच्या नावे परवाना असलेले रिव्हॉल्वर होते याच रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली. अश्विन जैन हा खटाव बिल्डिंगमध्ये राहात होता. तो घरी न आल्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याचीही तक्रार नोंदवण्यात आली होती.

अश्विनच्या मृत्यूनंतर चौकशी केली असता, त्याच्या मित्राने सांगितले की अश्विनने आम्हाला माझे आयुष्य संपले आहे असा मेसेज व्हॉट्स अॅपवर पाठवला होता. तीन महिन्यांपूर्वी व्हॉट्स अॅप ग्रुपवर आम्ही सगळे मित्र एकत्र आलो त्यात अश्विनही होता. गुरुवारपासून अश्विन घरातून बेपत्ता झाल्याचे मेसेज आमच्या ग्रुपवर पडत होते. त्यानंतर त्याचा एकच मेसेज आला. ज्यात माझे आयुष्य संपले आहे असे लिहिले होते. हा मेसेज वाचल्यावर आम्ही त्याला फोन करत होतो मात्र त्याचा फोन बंद होता असेही त्याच्या मित्राने म्हटले आहे.

अश्विनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच त्याच्या कारमध्ये कोणतीही सुसाइड नोटही मिळालेली नाही असेही पोलिसांनी म्हटले आहे. आता त्याने आत्महत्या का केली ? त्याच्यावर कर्ज होते का? कौटुंबिक तणाव होता का? या सगळ्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत असे समजते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 8:48 pm

Web Title: life is over last text of mumbai businessman who shot himself in his car
Next Stories
1 रेल्वे क्रॉसिंगवर लोकलची एनएमएमटीला धडक, १० जखमी
2 मुंबईत मंगळदास मार्केटला लागलेली आग नियंत्रणात
3 उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेची पोस्टरमधून फटकेबाजी
Just Now!
X