News Flash

महिला सहकाऱ्याची बलात्कार करून हत्या करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

तयार कपडे बनविण्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या १९ वर्षांच्या महिला सहकाऱ्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तरुणास मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा

| January 22, 2013 03:26 am

तयार कपडे बनविण्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या १९ वर्षांच्या महिला सहकाऱ्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तरुणास मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१० मध्ये ही घटना घडली होती.
नरेंद्र पासवान असे या नराधमाचे नाव आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. गनेडीवाला यांनी सोमवारी पासवान याला बलात्कार आणि हत्येच्या आरोपांत दोषी ठरविले. पासवान आणि संबंधित मुलीची दादर येथील तयार कपडे बनविण्याच्या कारखान्यात भेट झाली होती. त्यानंतर काही दिवसांनीच पासवानने तिच्यामागे लग्न करण्याचा तगादा लावला. परंतु तिने तो फेटाळून लावला. त्यामुळे त्याने तिचा पाठलाग करणे सुरू केले. १८ जुलै २०१० रोजी पासवानने या तरुणीशी संपर्क साधला आणि तिला कारखान्यात येण्यास सांगितले. पासवान तेथेच राहत असे. त्याने त्या वेळी पुन्हा एकदा तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्याच्या या कृतीवर त्या तरुणीने संताप व्यक्त केला. त्यामुळे चिडलेल्या पासवानने तिच्यावर बलात्कार करून तिच्याच दुपट्टय़ाने तिचा गळा आवळला.
पासवान एवढय़ावरच थांबला नाही तर त्याने तिचा मृतदेह कारखान्याच्या एका खोलीत फेकून देत तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर कारखान्यासह परिसरात खळबळ उडाली. पळून गेलेल्या पासवानला नंतर दोन महिन्यांनी अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:26 am

Web Title: life time jail to suspect who murdered the women after rape
Next Stories
1 पोलिसांनी उधळला अपहरणाचा कट
2 पालिकेची तीन नवी सुसज्ज रुग्णालये
3 पं. आनिंदो चटर्जी, कौशिकी चक्रवर्ती यांच्या कलाविष्काराने रसिकांनाजिंकले!
Just Now!
X