26 September 2020

News Flash

‘जीवरक्षकां’च्या वेतनात वाढ

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने तैनात केलेल्या कंत्राटी आणि हंगामी जीवरक्षकांच्या वेतनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली . पावसाळ्यात अनेक पर्यटक उत्साहाच्या भरात समुद्रात उतरतात आणि अंदाज

| June 15, 2013 02:35 am

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने तैनात केलेल्या कंत्राटी आणि हंगामी जीवरक्षकांच्या वेतनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली .
पावसाळ्यात अनेक पर्यटक उत्साहाच्या भरात समुद्रात उतरतात आणि अंदाज न आल्यामुळे प्राण गमावतात. त्यामुळे पालिकेने यंदाही गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, गोराई या समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात केले आहेत. दोन पाळ्यांत काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीवरील जीवरक्षकाला आठ हजार तर हंगामी जीवरक्षकाला सहा हजार रुपये देण्यात येत होते. यावर्षीपासून कंत्राटी जीवरक्षकाला १० हजार रुपये, तर हंगामी जीवरक्षकाला आठ हजार रुपये वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 2:35 am

Web Title: lifeguard wages increase by bmc
टॅग Bmc
Next Stories
1 सूरजच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर
2 जियाच्या मृत्यूस माझा मुलगा जबाबदार नाही – झरीना वहाब
3 मनोहर जोशी यांचा प्रताप; जावयासाठी चाळीची झोपडपट्टी!
Just Now!
X