23 September 2020

News Flash

VIDEO: राज ठाकरेंच्या घरी लगीनघाई, कृष्णकुंजला रोषणाई

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे दोघेही 27 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याचा विवाह सोहळा 27 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या घरी लगीनघाई आहे. राज ठाकरे यांचं वास्तव्य असलेल्या कृष्णकुंज इमारतीला आणि इतर परिसराला रोषणाई करण्यात आली आहे. कृष्णकुंज इमारतीला फुलांचीही सजावट करण्यात आली आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह सोहळा 27 जानेवारीला मुंबईतल्या सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार आहे. आक्रमक आणि झंझावाती अशी ओळख असलेले राज ठाकरे सध्या वर पित्याच्या भूमिकेत आहेत.

 

मुलगा अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका राज ठाकरेंनी स्वतः त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी नेऊन दिली. उद्धव ठाकरे सहकुटुंब या विवाह सोहळ्याला हजर राहणार आहेत अशीही माहिती मिळते आहे. त्याचप्रमाणे भाजपा, काँग्रेसमधल्या नेत्यांनाही या लग्नाला निमंत्रित करण्यात आलं आहे. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह या दोघांना या लग्नासाठी निमंत्रण देण्यात आलेलं नाही अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी मुलाच्या लग्नाच्या पत्रिका सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली.

गेल्याच वर्षी गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचाही साखरपुडा पार पडला. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आता ते दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्याला अवघे दोन दिवस उरल्याने कृष्णकुंजवर तयारी, उत्साह आणि लगबग पहाण्यास मिळते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 7:29 pm

Web Title: lighting at raj thackerays krushna kunj building for amit thackerays wedding
Next Stories
1 VIDEO : शाळेची बस दुकानात शिरली, सुदैवाने जीवितहानी नाही
2 एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करताना रेकॉर्ड केला ‘तो’ व्हिडीओ आणि…
3 जावा मोटरसायकलनी मुंबईत उघडल्या चार शोरूम
Just Now!
X