प्रौढांचे, हिंसक, बालविश्वाला धक्का लावणारे विषय टाळण्यासाठी नाटय़कर्मीचा पुढाकार,

राज्य बालनाटय़ स्पर्धेतील परीक्षक-समन्वयकांना मार्गदर्शन

प्रतिनिधी, मुंबई</p>

प्रौढ व बालविश्वाला धक्का लावणारे आशय बालनाटकांतून दाखवले जाऊ नयेत यासाठी राज्य बालनाटय़ स्पर्धेत सादर केल्या जाणाऱ्या बालनाटकांना विषयाची मर्यादा घालण्याचा निर्णय सांस्कृतिक  कार्य संचालनालयाने घेतला आहे. गेली काही वर्षे बालनाटकांतून प्रौढांचे, हिंसक किंवा बालवयाच्या सीमा पार करणारे विषय सातत्याने मांडले जात होते. त्यामुळे लहान मुलांची मानसिक ता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

बालनाटकातील अशा आशयाला प्राथमिक  पातळीवर रोखण्यासाठी स्पर्धेचे समन्वयक आणि परीक्षक यांना संचालनालयातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरात महाराष्ट्रातील दहा केंद्रांवरील दहा समन्वयक  आणि परीक्षक  उपस्थित होते. तर ज्येष्ठ रंगकर्मी मीना नाईक, कांचन सोनटक्के आणि वीणा लोकू र यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी मुलांची मानसिक ता, बदलता कल, बालविश्वातील विषय, लेखक -दिग्दर्शकांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

अनेकदा परिनिरीक्षण मंडळाक डून संमत होऊन आलेली संहिता बदलेली जाते आणि वेगळीच कलाकृती सादर केली जाते. या अनुभवावरून आता स्पर्धेची संहिता आधी समन्वयक  तपासतील. त्यात काही चुकीचे आढळ्यास त्यात सूचना केल्या जातील. किंवा स्पर्धेच्या वेळी तसा आशय सादर झाल्यास त्याचे कोणत्या निकषांवर परीक्षण करावे याबाबतही परीक्षकांना सूचना करण्यात आल्या.

महाराष्ट्राला लाभलेला बालनाटकांचा सांस्कृतिक  वारसा पुढे चालत राहावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे  गेली अनेक  वर्षे बालनाटय़ स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा महाराष्ट्रभरातून साडेतीनशे नाटय़संस्था या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. परंतु मागील काही वर्षांत बालमनाचे भावविश्व ओलांडून या नाटकांनी प्रौढांच्या विषयात प्रवेश केल्याचे प्रकर्षांने जाणवते.

खून, गुन्हे, कौटुंबिक  झगडे, स्मशानभूमीच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या कथा वारंवार सादर होत आहेत. सांस्कृतिक  कार्य संचालनालयाचे संचालक  बिभीषण चौरे सांगतात, ‘विषयांबाबत अनेक  तक्रारी येत आहेत. अशा संहितांना वेळीच रोखता यावे यासाठी हे शिबीर होते. यंदा केवळ समन्वयक  आणि परीक्षकांनाच मार्गदर्शन करण्यात आले. परंतु पुढच्या वर्षी लेखक दिग्दर्शकांनाही मार्गदर्शन करण्याचा विचार करणार आहे.’

लेखक  दिग्दर्शकांना मार्गदर्शनाची गरज

लहान मुलांच्या भावविश्वाकडे आपण कायमच दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्यांच्यासाठी आशय निर्मिती करताना आपण थेट प्रौढांक डे वळतो किंवा अतिशय बालिश गोष्टी सादर करतो. तसे न करता मुलांची सद्य:स्थिती, त्यांचे विचार आणि त्यांच्या जगातील अडचणी समजून नाटक  बसवायला हवे. ज्याद्वारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनाच शोधता येतील. अनेक दा प्रौढांच्या आशयामुळे आपण मुलांच्या डोक्यात चुकीचे विषय भरवून देतो ज्यांचा परिणाम त्यांच्या मनावर होत असतो. आणि हेच चित्र बदलण्यासाठी यंदा प्राथमिक  स्तरावर परीक्षक  आणि समन्वयकांसाठी हे शिबीर घेतले. परंतु याची अधिक  आवश्यक ता लेखक  दिग्दर्शकांना आहे.

      – मीना नाईक, ज्येष्ठ रंगक र्मी