लॉकडाउनला मुदतवाढ देण्यात आली असली, तरी राज्य सरकारनं केंद्राच्या सूचनांनुसार अनेक बाबतीत शिथिलता दिली आहे. एकल दुकानं सुरू करण्याबरोबर मद्य विक्री करण्यासही सरकारनं सशर्त परवानगी दिली. मात्र, या आदेशानंतरही मुंबईत गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे दारूची दुकानं उघडलीच नाही. मात्र, यासंदर्भातील गोंधळ लवकरच थांबणार असून, मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी मद्य विक्री सुरू करण्याचा आदेश जारी करणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांच्या हवाल्यानं झी२४ तासनं हे वृत्त दिलं आहे.

राज्यातील करोनाचा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. दुकानांबाबत सवलती देताना या भागांचा सरकारकडून विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, कंटेन्टमेंट झोन वगळता इतर झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची एकल दुकाने सुरू करण्याची सवलत दिली आहे. यात इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, स्टेशनरी, मद्य यांच्यासह इतर दुकानांना हाच नियम लागू असेल. एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने असा असेल. कोणते दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन करेल, असं राज्य सरकारनं रविवारी जारी केलेल्या आदेशात म्हटलं होतं. मात्र, या आदेशामुळे अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आहे.

राज्य सरकारनं लॉकडाउनमधून शिथिलता देत मद्य विक्रीची दुकानं सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, मुंबईत मद्य विक्रेत्यांनी त्यामुळे दुकानंच उघडली नाही. विक्रेत्यांमधील गोंधळाबरोबरच यामुळे तळीरामांचाही हिरमोड झाला. हा गोंधळ लवकरच दूर होणार आहे. मुंबईत दुपारनंतर किंवा उद्यापासून मद्य विक्रीची दुकानं सुरू होण्याची चिन्ह आहेत. यासंदर्भात मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी लवकरच आदेश देणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली.

abhay daga upsc marathi news, abhay daga upsc latest marathi news
“नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा

illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका