News Flash

कुलाब्याच्या ताज हॉटेलजवळ जिवंत काडतुसे सापडली

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील वाहनतळाजवळ आज (बुधवार) एकूण १६ जिवंत काडतुसे सापडल्याने एकच खळबळ माजली.

| April 2, 2014 03:21 am

कुलाब्याच्या ताज हॉटेलजवळ जिवंत काडतुसे सापडली

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील वाहनतळाजवळ आज (बुधवार) एकूण १६ जिवंत काडतुसे सापडल्याने एकच खळबळ माजली. पेव्हर ब्लॉकच्या खाली दडवून ठेवलेली ही काडतुसं  दुपारी बारा वाजताच्या सुमारास हस्तगत करण्यात आली. विशेष म्हणजे, परवानाधारक ३२ बोअरच्या रिव्हॉल्वरची हि न वापरलेली जिवंत काडतुसं आहेत. काडतुसं तिथे कुठून आली आणि कुणाच्या रिव्हॉल्वरची आहेत याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 

(संग्रहित छायाचित्र ) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 3:21 am

Web Title: live bullets were found near taj hotel colaba
Next Stories
1 ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल नेत्यांमध्येच विश्वासाचा अभाव’
2 संपामुळे बेस्टचे साडेतीन कोटींचे नुकसान
3 मुजोर शरद रावांचीच आंदोलनाला फूस!
Just Now!
X