केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक लोकशाहीसाठी अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिका हे जगाच्या मुक्त लोकशाही व्यवस्थेचे प्रतिक असल्याने या निवडणुकीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमेरिका फक्त अमेरिकनांचीच या अशा भूमीपुत्र सदृष भाषेमुळे अमेरिकेच्या मुक्त लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून त्यामुळेच या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल, असे मत गिरीश कुबेर यांनी लाईव्ह चॅटचा समारोप करताना व्यक्त केले. विषयांतर न करता अतिशय मुद्देसूदपणे विचारलेल्या प्रश्नांबाबतही कुबेर यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. वाचकांना गिरीश कुबेर यांनी दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर वाचायला मिळतील.