01 March 2021

News Flash

मुंबईत पावसाची संततधार; रेल्वेसेवा उशिराने

आज पहाटेपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.

मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. काल रात्रीपासूनच मुंबई शहर, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर आज पहाटेपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.  विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव या पश्चिम उपनगरांसह भांडुप, विक्रोळी, मुलुंडमध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा, परळमध्येही पहाटेपासून पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबईतही मुसळधार पाऊस आहे. दरम्यान, या पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेववर परिणाम झाला आहे.  सध्या मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत केवळ धुळ्याचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा दोन टक्के ते तब्बल ७० टक्क्य़ांपर्यंत अधिक पाऊस झाला होता. गेल्या दोन आठवडय़ात मात्र पावसाने ओढ दिली असून राज्यात सरासरीच्या दहा टक्केही पाऊस झालेला नाही.

लाईव्ह अपडेटस्

* मध्य रेल्वेमार्गावर लोकल १५ तर हार्बर मार्गावरील लोकल १० मिनिटे उशिराने धावत आहेत.
* मध्य रेल्वेची वाहतूक १० मिनिटे उशिराने
* माटुंगा, दादर, लोअर परळ, एलफिस्टन, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये जोरदार पाऊस
* मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची हजेरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 9:25 am

Web Title: live rain in mumbai disturbs railway train service
Next Stories
1 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2 उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना साक्षीसाठी समन्स
3 पुनर्विकासात ढवळाढवळ नको!
Just Now!
X