28 February 2021

News Flash

Mumbai Marathon Live : इथिओपिआचा सोल्मन डेक्सिस ठरला विजेता

देशविदेशातील धावपटूंनी घेतला सहभाग

११व्या मुंबई मॅरेथॉनचा विजेता इथोपिआचा धावपटू सोल्मन डेक्सिस.

मुंबई : मुंबईत ११ व्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे उत्साहात सुरुवात झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या स्पर्धेला फ्लॅगऑफ दिला. पहाटे ५.४५ वाजता मुख्य मॅरेथॉनला तर ६.१० वाजता ड्रीम रनला सीएसटीहून सुरुवात झाली. दरम्यान, अर्ध मॅरेथॉनवर सेनादलाच्या धावपटूंनी नाव कोरले असून महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही सहभाग घेतला.

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहा प्रकारच्या रनचा समावेश असून पूर्ण मॅरेथॉन ही ४२.१९५ किमीची असून यामध्ये ६,९५५ धावपटू सहभागी झाले आहेत. यामध्ये देशविदेशातील धावपटूंचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे यंदाही या रनमध्ये इथोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व असण्याची शक्यता आहे. हाफ मॅरेथॉन २१.०९७ किमीची असून यात १४,९५० धावपटू सहभागी झाले आहेत. टाइम रन मॅरेथॉन १० किमीची असून यात १, ६५२ स्पर्धक सहभागी झाले आहेत. ड्रीमरनसाठीचे अंतर हे ६.६ किमीचे असून यात १८,५०० मुंबईकरांनी सहभाग घेतला आहे. सिनिअर सिटिझन रन ४.६ किमीची असून यात १,१३० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. चॅम्पिअन विथ डिसेब्लीटी रन २.४ किमीची असून यात १,२२० अपंग स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेसाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली असून या संपूर्ण इव्हेंटसाठी २७ पाणी केंद्रांवर मिळून १.५ लाख लिटर पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याचबरोबर ११ रुग्णवाहिका, १२ वैद्यकीय केंद्र, ५०० डॉक्टर्स, ३४३ प्रसाधन गृह, २ बेस कॅम्प (आझाद मैदान गेट नंबर १ आणि २), ९,००० पोलिस कर्मचारी, १,४०० सुरक्षा रक्षक, ९ रिस्टोरेशन केंद्र, १,४०० स्वयंसेवक, ११ रिफ्रेश झोन, ७२ केमिकल टॉयलेट्स, ११ कुल स्पंज स्टेशन आणि ३३ स्वच्छतागृह आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

UPDATES :

एलिट मॅरेथॉन पूर्ण झाली असून यात इथिओपिआचा धावपटू सोल्मन डेक्सिसने विजेतेपद मिळवले आहे. तर दुसऱ्या स्थानी बहारिनचा धावपटू आणि तिसऱ्या क्रमांकावर केनियाच्या धावपटू राहिला. भारतीय पुरुषांमध्ये गोपी थोनाकल मॅरेथॉन विजेता ठरला आहे. तर, नितेंद्रसिंह रावत भारतीय पुरुषांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. तसेच इथिओपियाची अमानी गोबेना महिलांच्या मॅरेथॉनमध्ये विजेती ठरली.

यावेळी सहभागी धावपटूंना आणि नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध बँड पथकांनी सुरेल धून वाजवत प्रोत्साहन दिले. तसेच काही जण पारंपारिक वेशात हातात राष्ट्रध्वज आणि भगवे झेंडे घेऊन मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

हौशी मुंबईकरांचा सहभाग असलेल्या ड्रीम रनला ८. २० वाजता सुरुवात झाली. यात विविध सामाजिक संदेशांचे फलक घेऊन लोक सहभागी झाले होते. बॉलिवूड अभिनेता राहुल बोस आणि अभिनेत्री तारा शर्मा यांची या मॅरेथॉनमध्ये विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर मंदिरा बेदी आणि काजल अगरवाल या अभिनेत्रीही भल्या पहाटे महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये उत्साहात सहभागी झाले होते. त्याचबरोबर मिलिंद सोमण ने ही या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.

महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये संजीवनी जाधव या तरुणीने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मोनिका आथरे ही दुसऱ्या स्थानावर राहिली. अपंगांसाठीच्या व्हीलचेअर मॅरेथॉनला ८.१० वाजता सुरुवात झाली.

अर्ध मॅरेथॉनचा निकाल हाती अाला असून यात सेना दलाच्या धावपटूंनी बाजी मारली आहे. यामध्ये प्रदीप कुमार सिंग चौधरी यांनी पहिला क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक शंकरलाल थापा आणि तिसरा क्रमांक दीपक कुंभार या धावपटूंनी पटकावला आहे. एलिट मॅरेथॉनलाही सुरुवात झाली असून राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि भाजप प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्या फ्लॅगऑफने या स्पर्धेला सुरुवात झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 7:34 am

Web Title: live the mumbai international marathon flagship started by the governor
Next Stories
1 सेमी इंग्रजी शाळांची झाडाझडती सुरू
2 शिक्षण ‘पीएचडी’, वेतन मात्र ६ हजार!
3 राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात ‘समृद्धी मार्गा’ला मात्र बगल
Just Now!
X