टाळेबंदीमुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली असून केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना खेळत्या भांडवलासाठी कर्जरूपात १० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.  कर्जाची १० हप्त्यांमध्ये परतफेड करावी लागणार आहे. नियोजित काळात कर्जाची परतफेड केल्यास सात टक्के व्याज अनुदान रूपात मिळणार आहे. कर्जासाठी http://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.