26 February 2021

News Flash

पालिकेकडून बेस्टला कर्जपुरवठा

सत्ताधारी शिवसेनेच्या घोषणेनुसार अद्याप मुंबई महापालिके च्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन झालेला नाही.

 

|| इंद्रायणी नार्वेकर

चार टक्के दराने ४०६ कोटींचे कर्ज; बेस्टची तूट वाढण्याची शक्यता

मुंबई : पालिकेकडून अनुदानाची अपेक्षा असताना बेस्ट उपक्रमाला पुढील आर्थिक वर्षासाठी ४०६ कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाचा व्याज दर ठरवण्यात आला असून चार टक्के व्याजाने हे कर्ज दिले जाणार आहे. व्याजदर तुलनेने कमी असला तरी या कर्जामुळे बेस्टची तूट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्ताधारी शिवसेनेच्या घोषणेनुसार अद्याप मुंबई महापालिके च्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन झालेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून बेस्टला पालिकेने भरघोस अनुदान दिले. दोन वर्षांपूर्वी पालिकेने राखीव निधीतून बेस्टला दोन हजार कोटी रुपयांची मदत दिली होती, तर गेल्या वर्षी एक हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. मात्र करोनामुळे खर्च वाढल्यानंतर ही तरतूद कमी करून एक हजार कोटी रुपये करण्यात आली होती. त्यापैकी जानेवारी २०२१ पर्यंत बेस्टला ९१८ कोटी देण्यात आले आहेत. येत्या आर्थिक वर्षात बेस्टला दोन हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची अपेक्षा होती. यंदा मात्र पालिकेने हात आखडता घेत बेस्टला केवळ ७५० कोटी रुपयांचे अनुदान विकासकामांसाठी दिले आहेत, तर कर्मचाºयांची थकीत देणी देण्यासाठी अत्यंत कमी व्याज दराने ४०६ कोटींचे कर्ज देण्याचे ठरवले आहे.

महापालिकेने बेस्ट उपक्रमाकरिता तयार केलेल्या आर्थिक पुनरुज्जीवन आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक साहाय्य केले आहे. त्यात पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी करणे, कर्जाची परतफेड, दैनंदिन खर्च भागवणे आदी कामांसाठी यंदा ७५० कोटींची मदत देण्याकरिता तरतूद केली आहे. बेस्टवर कर्जाचा आधीच बोजा असल्यामुळे निवृत्त कर्मचाºयांची देणी देणेही बेस्टला आता मुश्कील झाले आहे.

३६४९ कर्मचाºयांची देणी थकवल्यामुळे कर्मचाºयांमधील नाराजी विकोपाला गेली आहे. कर्मचाऱ्यांनी बेस्टविरोधात खटलाही चालवला आहे. त्यामुळे ही देणी देण्यासाठी पालिकेने बेस्टला कमी व्याजदराने ४०६ कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा आगामी अर्थसंकल्पात केली होती. मात्र त्याचा व्याजदर काय असेल याबाबत उत्सुकता होती.

‘…तर तूट वाढतच जाणार’

बेस्टची महसुली तूट १८०० कोटींवर गेली आहे, तर भांडवली खर्चासाठी २०० कोटींची गरज आहे. त्यामुळे बेस्टने पालिके कडे २००० कोटींचे अनुदान मागितले होते. पालिका कायद्यानुसार बेस्टला अनुदान देणे ही पालिके ची जबाबदारी आहे. अन्य प्रकल्पांसाठी जशी तरतूद के ली जाते तशीच तरतूद पालिके ने बेस्टसाठी करणे आवश्यक आहे. नाहीतर पुढील वर्षी तूट वाढतच जाणार, अशी प्रतिक्रिया बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली आहे.

यापूर्वीच्या कर्जामुळे तूट वाढली

यापूर्वी बेस्टला पालिकेने २०१३ मध्ये १६०० कोटींचे कर्ज १० टक्के  व्याजाने दिले होते. या कर्जाचा हप्ता वसूल करण्यासाठी ‘एस्क्रो अकाउंट’ कार्यपद्धती वापरण्यात आली होती.  त्यामुळे मुद्दल व व्याजाची रक्कम दर महिन्याला या खात्यात थेट वसूल के ली जात होती.  या कर्जाची परतफेड करण्यासाठी बेस्टला अनेक वर्षे लागली होती. तसेच व्याजापोटी बेस्टने ५०० कोटी दिले होते. त्यामुळे आता पुन्हा कर्ज दिल्यास बेस्टची तूट वाढण्याचा धोका आहे.

बेस्टला चार टक्के  दराने व्याज दिले जाणार आहे. मात्र किती कालावधीत हे कर्ज फे डायचे ते अद्याप निश्चिात के लेले नाही. – पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:02 am

Web Title: loan to best from the municipality akp 94
Next Stories
1 पारपत्र सेवेची ‘डिजिलॉकर’शी जोडणी
2 मुंबईत एमएमआर रिजनमध्ये रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय
3 VIDEO: गरीबांनी कसं जगायचं? लॉकडाउनबद्दल मुंबईकरांच्या संमिश्र भावना
Just Now!
X