News Flash

मध्यरेल्वेची वाहतूक पूर्ववत

पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वेमार्गांवर महत्त्वाचे अभियांत्रिकी काम असल्याने आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.

| July 19, 2015 12:46 pm

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घसरलेला लोकलचा डबा रुळावरुन हटवण्यात यश आलं आहे. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्ववत झाली आहे.
डोंबिवली व ठाकुर्ली दरम्यान लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.  ठाकुर्लीहून डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकलचा डबा डोंबिवली गणेश मंदिरासमोरील भागात घसरल्यामुळे हा अपघात घडला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक रखडली होती. मात्र, आता वाहतूक सुरळीत झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 12:46 pm

Web Title: local derails between dombivali thakurli
टॅग : Central Railway
Next Stories
1 अनुदानास पात्र शाळांना अंशत: दिलासा
2 गुन्ह्याचा पंचनामा करण्याच्या कामातून शिक्षकांची सुटका
3 एसटीत पुन्हा वाहकाच्या चिमटय़ाची ‘टिकटिक’
Just Now!
X