01 October 2020

News Flash

‘स्थानिक निवडणुकांचाही ‘एक राष्ट्र – एक निवडणुकी’त विचार व्हावा’

राज्य घटनेतील ७३ व ७४ व्या दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ही परिषद झाली.

मुंबई येथे शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी विविध पुस्तकांचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, आयोगाचे सचिव शेखर चन्ने आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबई : सध्या चर्चेत असलेल्या ‘एक राष्ट्र – एक निवडणूक’ या संकल्पनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या समावेशाबाबतदेखील विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.

राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. राज्य घटनेतील ७३ व ७४ व्या दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ही परिषद झाली.

वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे बराच वेळ विविध ठिकाणी आचारसंहिता असते. त्याचा निर्णय प्रक्रियेवरही परिणाम होतो. ते टाळण्यासाठी ‘एक राष्ट्र – एक निवडणूक’ धोरणात या निवडणुकांचादेखील विचार होण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विविध आंदोलनांमुळे राजकीय नेत्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे असतात. त्यावरून उमेदवारांना सरसकट गुन्हेगार ठरविले जाऊ  नये. त्यासाठी निवडणुकांमध्ये पारदर्शकतेबरोबरच व्यावहारिक दृष्टिकोन आणण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

निकोप निवडणुकांसाठी बिनचूक मतदार याद्या हव्यात. मतदार याद्या आधार कार्डशी संलग्न केल्या पाहिजेत आणि सक्तीच्या मतदानाबाबत विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांना केवळ अधिक अधिकार दिल्याने परिवर्तन होईल असे नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींची क्षमता वृद्धिंगत करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यापर्यंत सर्वंकष माहिती आणि ज्ञान पोहचले पाहिजे.

निवडणुकीच्या काळात उमेदवारांवर खर्चाचे बंधन असते; परंतु एरवी काहीच बंधन नसते. या विरोधाभासासंदर्भात सखोल चिंतनाची आवश्यकता असल्याचे यावेळी बोलताना अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. चांगल्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कारण सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका आणि चांगली निवड अपेक्षित आहे. शंभर टक्के मतदानासाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत. तर निकोप निवडणुका आणि सदृढ लोकशाहीसाठी राज्य निवडणूक आयोगाची स्वायत्तता राखण्याचे भान राज्य शासनाने कायमस्वरूपी बाळगले पाहिजे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

शेखर चन्ने यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. तर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉम्र्स (एडीआर) या संस्थेचे संस्थापक विश्वस्त  अजित रानडे यांनी आभार मानले. कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेट फोरमच्या (सीएलजीएफ) अनुया कुवर यांनी सूत्रसंचलान केले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:38 am

Web Title: local elections should be considered for one nation one election say devendra fadnavis
Next Stories
1 डोंबिवलीत मेनहोलमध्ये पडून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू
2 Bhima Koregaon case : गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांना तात्पुरता दिलासा
3 VIDEO – मोबाइल फोनमधून सोन्याची तस्करी, विमानतळावर ८७ लाख ५० हजारांचं सोनं जप्त
Just Now!
X