अंबरनाथ, कल्याण, विठ्ठलवाडी या स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साठल्याने बदलापूरहून मुंबईच्या दिशेने येणारी लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच कल्याण, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली या ठिकाणी चांगलाच पाऊस पडतो आहे. या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. रुळांवरही पाणी साठल्याने बदलापूरहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणारी लोकलसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

या आधी मागच्या महिन्यात २ जुलै रोजीही असाच पाऊस पडला होता. त्यावेळी मध्य रेल्वे सोळा तास ठप्प होती. तसेच मागच्या शनिवारीही महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ पावसाच्या पाण्यामुळे अडकली होती. त्यावेळी एनडीआरएफ, लष्कर आणि नौदल यांच्या जवानांनी या प्रवाशांची सुटका केली. आता पुन्हा एकदा बदलापूरहून मुंबईला येणारी लोकल सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर या ठिकाणी रुळांवर पाणी साठलं आहे. त्यामुळे सेंट्रल रेल्वेची लोकल सेवाही १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. तर कल्याणपासून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या स्थानकांवर बदलापूहून मुंबईच्या दिशेने