News Flash

रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना परळजवळ लोकलची धडक

वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकून रेल्वेमार्ग ओलांडण्याची घोडचूक मध्य रेल्वेच्या तीन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना भारी पडली. परळ आणि करीरोड या स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना लोकलने या तिघांना

| September 30, 2014 12:01 pm

वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकून रेल्वेमार्ग ओलांडण्याची घोडचूक मध्य रेल्वेच्या तीन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना भारी पडली. परळ आणि करीरोड या स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना लोकलने या तिघांना धडक दिली. या अपघातात एक कर्मचारी ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील कार्यशाळेत काम करत होते.
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणारे मोहन सरोदे (२१), शुभम महाजन (१९) आणि पवन सपकाळ (२४) हे तिघे सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास काम आटपून निघाले. हे तिघेही डोंबिवली येथे राहणारे आहेत. मध्य रेल्वेवरील करीरोड स्थानकात येऊन गाडी पकडण्याऐवजी या तिघांनी मधूनच रेल्वेमार्गावर चालण्यास सुरुवात केली. दरम्यान, करीरोड आणि परळ या स्थानकांदरम्यान मुंबईहून कुल्र्याला जाणाऱ्या लोकलने त्यांना उडवले. तिघांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान पवन सपकाळ याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर मोहन आणि शुभम हे दोघे गंभीर जखमी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 12:01 pm

Web Title: local train hit training employees at parel
टॅग : Local Train
Next Stories
1 मुंबईचा पारा ३७ अंश सेल्सियसवर
2 कागदी, प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर बंदीबाबत ३० नोव्हेंबपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश
3 चव्हाण यांनी पदाचा दुरुपयोग केला नसल्याचा पुरावा द्या!
Just Now!
X