News Flash

रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे-मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

विविध कामांसाठी आज (१७ नोव्हेंबर) रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे-मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर व पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे- कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

कधी- स.११.२० ते दु.३.५० वा

परिणाम – कल्याण ते ठाणे मार्गादरम्यान अप जलद लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यानंतर ठाणे ते सीएसएमटीपर्यंत पुन्हा जलद मार्गावर धावतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकात जलद लोकल थांबतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. याच स्थानकातून रत्नागिरीसाठी गाडी सुटेल.

हार्बर मार्ग

कुठे – पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर

कधी – स. ११.३० ते दु. ४.०० वा.

परिणाम – पनवेल ते सीएसएमटी सकाळी ११.०६ ते सायं. ४ व सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यान स. १०.०३ ते दु. ३.१६ पर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ठाणे ते वाशी, नेरुळ या ट्रान्स हार्बरवर लोकल धावतील. नेरुळ, बेलापूर ते खारकोपर दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे

कुठे – मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धिमा मार्ग

कधी – स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.

परिणाम – मरिन लाइन्स ते माहीम दरम्यान अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावर ब्लॉक असल्याने या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर धावतील. त्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड स्थानकात धिम्या लोकल थांबणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 9:08 am

Web Title: local update mega block on central western and harbour line bmh 90
Next Stories
1 ‘केईएम’मधील डॉक्टरची आत्महत्या
2 राष्ट्रपती राजवट लागू झाली तरीही विधान भवनात अधिवेशनाची लगबग
3 शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत
Just Now!
X