News Flash

राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अख्या महाराष्ट्रभर भाजपाविरोधात सभांचा धडका लावला आहे.

प्रतिकात्मक फोटो

‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अख्या महाराष्ट्रभर भाजपाविरोधात सभांचा धडका लावला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची जनतेसमोर पोलखोल करत आहेत. सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणाऱ्या राज ठाकरेंची तोफ आता मुंबईतही धडघडणार आहे.  २३ एप्रिल रोजी शिवडी येथे आणि २४ एप्रिल रोजी भांडूप येथे राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्याशिवाय २५ एप्रिल रोजी पनवेल येथे आणि २६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावर सायंकाळी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले असून

महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावत राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात प्रचार सुरू केला आहे. राज ठाकरें यांच्या सभांचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला सुरू आहे.

२४ एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या सभेचे मुंबईतील काळाचौकी अभ्युदयनगर येथे आयोजन केले होते. तेथे मात्र मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारात निवडणूक आयोगानं मनसेला स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेण्यास सांगत चेंडू पालिकेकडे टोलवला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 9:15 am

Web Title: lok sabha elections 2019 permission for mns chief raj thackerays rally in mumbai 23 and 24 april
Next Stories
1 माझ्यासारख्या नेत्यामुळेच युती सरकारला कामे करावी लागली – उदयनराजे भोसले
2 बारामतीच काय महाराष्ट्रात कुठेच भाजपला बाप जन्मात यश मिळू देणार नाही – पवार
3 ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटास राजकारणाचा अडथळा – ओबेरॉय
Just Now!
X