24 January 2021

News Flash

‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’

सहभागी होण्यासाठी शेवटचे दोन दिवस

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धे’त सहभागी होण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. १ सप्टेंबपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येईल.

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेत सहभागी होता येईल. ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर या विभागांत घेतली जाणार आहे.

यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने अनेक गणेशभक्तांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. प्रदूषणाचे संभाव्य धोके लक्षात घेता नागरिकांमध्ये पर्यावरणरक्षणाविषयी जागरूकताही वाढत आहे. प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक वस्तूंवर बंदी असल्याने गणेशभक्तांनी सजावटीचे अनेक कल्पक मार्ग शोधून काढले आहेत. याच कल्पकतेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सहभागासाठी..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीची व सजावटीची वेगवेगळी पाच ते सहा छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात १ सप्टेंबपर्यंत पाठवावीत. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि सजावट यांची तीन वेगवेगळ्या बाजूंनी काढलेली छायाचित्रे पाठवणे आवश्यक आहे. प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकाने आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आणि सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी पाठवावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. छायाचित्रे टपाल, कुरिअरने अथवा loksatta.ecoganesha@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावीत.

अधिक माहितीसाठी संपर्क : लोकसत्ता ब्रॅण्ड विभाग, ७ वा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, मो. नं. ९७७३१५४९२४.

प्रतिज्ञा पर्यावरणरक्षणाची!

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’तर्फे  गणेशोत्सवाच्या निमित्ताने निसर्ग आणि वसुंधरेच्या संवर्धनासाठी संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा संकल्प म्हणजे, वर्षभरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा करू. दैनंदिन जीवनात प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करू. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करून जल नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची शपथ घेऊ. विजेचा अतिरेक टाळू. घरातील ओला आणि सुका कचरा वेगळे करून त्याचे सेंद्रिय खत निर्माण करू. टाकाऊ वस्तूंचा कमीत कमी वापर आणि हरित जीवनशैली हीच भविष्यातील समृद्ध निसर्गाची नांदी ठरेल.

पारितोषिके

* नऊ हजार ९९९ रुपयाचे प्रथम पारितोषिक

* सहा हजार ६६६ रुपयांचे द्वितीय पारितोषिक

* २००१ रुपये विशेष पारितोषिक

* विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 12:22 am

Web Title: lok satta eco friendly domestic ganeshotsav competition abn 97
टॅग Ganeshotsav
Next Stories
1 खासगी रुग्णालयांच्या दरनियंत्रणाला मुदतवाढ देण्यास टाळाटाळ
2 ग्रामीण भागात करोना रुग्णांमध्ये वाढ
3 जेमतेम १९ टक्के विद्यार्थ्यांची पहिली पसंती फळाला
Just Now!
X