राज्यभरातील नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी ‘सॉफ्ट कॉर्नर’प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आता केवळ महिन्याभरावर येऊन ठेपली आहे.गेल्या वर्षी दोनशेहून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतलेल्या या स्पध्रेसाठी यंदाही राज्यातील महाविद्यालयांमध्ये तयारी सुरू झाली असून या स्पध्रेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. २९ सप्टेंबरपासून राज्याच्या विविध केंद्रांवर होणारी ही स्पर्धा तीन फेऱ्यांत होईल. या स्पध्रेची प्राथमिक फेरी २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान होईल. तर विभागीय अंतिम फेरी ६ ते १३ ऑक्टोबर आणि महाअंतिम फेरी १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडेल.‘पृथ्वी एडिफिस’च्या सहकार्याने आणि अस्तित्त्व संस्थेच्या मदतीने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेसाठी नॉलेज पार्टनर म्हणून ‘स्टडी सर्कल’ आणि ‘टेलिव्हिजन व रेडिओ पार्टनर’ म्हणून अनुक्रमे ‘झी मराठी नक्षत्र’ आणि ‘रेड एफएम’ यांची जोड मिळाली आहे. तर या एकांकिकांमधील हिऱ्यांना मालिका, चित्रपट, नाटके यांचे कोंदण देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. लोकांकिकेच्या रंगमंचावर आपली सवरेत्कृष्ट कला सादर केल्यानंतर या स्पर्धेतील काही स्पर्धकांना मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.
स्पध्रेचे वेळापत्रक

केंद्र           प्राथमिक फेरी    अंतिम फेरी

औरंगाबाद             २९ व ३० सप्टेंबर      ६ ऑक्टोबर

नागपूर         १ व २ ऑक्टोबर ७ ऑक्टोबर

रत्नागिरी       २ ऑक्टोबर     ८ ऑक्टोबर

अहमदनगर     २ ऑक्टोबर     ९ ऑक्टोबर

ठाणे           ३ ऑक्टोबर     ११ ऑक्टोबर

पुणे           ४ ऑक्टोबर     १३ ऑक्टोबर

नाशिक         ४ ऑक्टोबर     १२ ऑक्टोबर

मुंबई          ४ ऑक्टोबर     १० ऑक्टोबर

जानेवारीनंतरच्याच संहिता
गेल्या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील महाविद्यालयांमध्ये नवीन संहितांचे लेखन झाले. या निमित्ताने महाराष्ट्राला दोनशेहून अधिक नवीन संहिता आणि संहिता लेखक मिळाले. यंदाही या स्पध्रेसाठी जानेवारी २०१५च्या पुढे लिहिलेल्या संहिताच स्वीकारल्या जाणार आहेत. याबाबतच्या नियम आणि अटी तसेच  यंदाच्या सॉफ्ट कॉर्नर ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेच्या प्राथमिक तसेच विभागीय अंतिम फेऱ्यांचे वेळापत्रक indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2015 या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच लोकसत्ता लोकांकिकांचे प्रवेश अर्जही या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. गेल्यावर्षी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. यंदाही नाटय़रसिक या स्पर्धेची आतुरतेने वाट असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झाले आहे.