गुरुवारी प्रकाशन सोहळा; संकर्षण कऱ्हाडे आणि अभिजीत खांडकेकर यांची उपस्थिती

भारताला प्रचंड मोठा सागर किनारा लाभला असून पूर्व आणि पश्चिम क्षेत्रांत वसलेल्या राज्यांनी उपलब्ध सागरी संपत्तीचा वापर करून वैशिष्टय़पूर्ण खाद्यसंस्कृती विकसित केली आहे. स्वादिष्ट आणि पौष्टिक आहाराचा मंत्र सांगणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकात यंदा या किनारीक्षेत्रांमधील समृद्ध पाककृतींची ओळख करून देण्यात आली आहे. गुरुवारी  २२ आगस्ट रोजी, ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे सायंकाळी ६ वाजता या खास अंकाचे प्रकाशन होणार आहे.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खाण्याच्या गरजा बदलतात. त्या गरजांनुरूप कुटुंबातील प्रत्येकासाठी पौष्टिक आहारसूत्रे आखून देणारा  ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ हा वार्षिकांक गेल्या काही वर्षांत वाचकप्रिय बनला आहे. किनारा म्हटला की आहार विविध प्रकारच्या मासळीने समृद्ध तसेच भात आणि नारळ हे घटकही व्यंजनांत महत्त्वाचे. या  घटकांचा वापर मुख्यत्वे असला तरी प्रत्येक राज्यातील पदार्थांची खासियत मात्र वेगवेगळी. हीच खासियत या विशेषांकात वाचायला मिळणार आहे.  नऊ राज्यातील खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असणाऱ्या लेखिकांनी एकेका राज्यातील महत्त्वाच्या पदार्थाचा परिचय करून दिला आहे.

प्रायोजक : तन्वी हर्बल, सह प्रायोजक  श्री धूतपापेश्वर, बँकिंग पार्टनर अपना बँक, पॉवर्ड बाय किंजीन फूड्स प्रा. लि., के. के. ट्रॅव्हल्स, आनंद कुमार, हेल्थकेअर पार्टनर होरायझन हॉस्पिटल.

खास आकर्षण..

* अंकात गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि प. बंगाल या राज्यांच्या खाद्यसंस्कृतीत काय दडले आहे, याची माहिती.

* अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि अभिजीत खांडकेकर यांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा प्रकाशन सोहळा होणार आहे. तसेच यंदाच्या पूर्णब्रह्मच्या लेखिकांचीही कार्यक्रमाला उपस्थिती असेल.

प्रकाशन सोहळा

* कुठे – हॉटेल टिप टॉप प्लाझा, ठाणे ’केव्हा – २२ ऑगस्ट, संध्याकाळी ६ वाजता