21 February 2019

News Flash

‘लोकसत्ता ९९९’ला जल्लोषात सुरुवात

अभिनेत्री ऋजुता देशमुख हिची उपस्थिती सोहळ्याचे खास आकर्षण ठरली.

अभिनेत्री ऋजुता देशमुख यांना भेट देताना राम बंधूचे भानुदास गुंडकर.

मुंबई : नवभक्ती, नवरंग आणि नवरात्री असा तिहेरी संगम असलेल्या ‘लोकसत्ता ९९९’ या अनोख्या स्पर्धेचा पहिला सोहळा जोगेश्वरीच्या ‘दुबे पांचाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’त बुधवारी रात्री रंगला. उखाणे आणि पारंपरिक खेळांच्या स्पर्धाबरोबर नृत्य, पाककला, प्रश्नमंजुषा आदी विविध स्पर्धानी सोहळ्यात रंगत आणली. आबालवृद्धांच्या सहभागामुळे हा आनंद सोहळा ठरला.

नवरात्रोत्सव केवळ गरब्यापुरता मर्यादित न ठेवता आपल्या मराठमोळ्या संस्कृतीशी मिलाफ घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘नवभक्ती, नवरात्री आणि नवरंग ९९९’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. राम बंधु चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’ अंतर्गत या उपक्रमाचा पहिला सोहळा जोगेश्वरी पूर्व येथील श्यामनगरमधील ‘दुबे पांचाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’त पार पडला. अभिनेत्री ऋजुता देशमुख हिची उपस्थिती सोहळ्याचे खास आकर्षण ठरली. सूत्रसंचालक स्मिता गवाणकर आणि कुणाल रेगे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. प्रश्नमंजुषेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यातील विजेत्यांमध्ये मजेदार फुगे आणि स्ट्रॉपासून लॉलिपॉप बनवण्याचा खेळ झाला.

दाम्पत्यांमध्ये हार, कंबर पट्टा, पैंजण असा गमतीदार खेळ झाला. त्यांनी उत्तमोत्तम उखाणे घेतले. तसेच मंडळातील लहान मुलांनी नृत्य सादर केले. सामूहिक नृत्याविष्कारही सादर करण्यात आला होता. बॉलीवूड, लावणी, जोगवा नृत्यांमध्ये प्रेक्षक दंग झाले. सौभाग्यवतींच्या स्पर्धेत जिंकलेल्या पूजा दळवी यांना ‘एम. के. घारे ज्वेलर्स’चा एक लखलखता हार एम. के. घारे ज्वेलर्सचे महेश झुंझारराव यांच्या हस्ते देण्यात आला.

दिवाळी फराळ या पाककला स्पर्धेत सर्वाधिक सदस्य सहभागी झाले. त्यात सविता तिमिले, तेजश्री परब आणि रुपाली राऊ ळ या विजेत्यांना राम बंधु मसालेतर्फे पारितोषिके देण्यात आली. स्पर्धकांनी मेथीचे लाडू, ब्रेड पिझ्झा करंजी आणि कॉर्न पालक चीझ करंजी हे पदार्थ बनविले होते. परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ स्पर्धेत पाहायला मिळाल्याचे अभिनेत्री आणि परीक्षक ऋजुता देशमुखने सांगितले. नवरात्रोत्सवाला केसरी टूर्सचे प्रमोद दळवी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जोगेश्वरी येथील ‘दुबे पांचाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’ला ‘लोकसत्ता’तर्फे ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश देण्यात आला.

प्रायोजक

राम बंधु चिवडा मसाला प्रस्तुत लोकसत्ता ९९९ चे सहप्रायोजक केसरी टूर्स, कलर्स आणि रिजन्सी ग्रुप आहे. हा कार्यक्रम पॉवर्ड बाय एम. के. घारे ज्वेलर्स आहे. बॅंकिंग पार्टनर अपना सहकारी बँक लिमिटेड आहे.

आज विक्रोळीत

‘लोकसत्ता ९९९’ हा उपक्रम शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) विक्रोळीच्या ‘दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ’, दुर्गामाता मैदान, कन्नमवारनगर, विक्रोळी पूर्व येथे होणार आहे.

‘लोकसत्ता ९९९’ हा कार्यक्रम प्रथमच जोगेश्वरीतील श्यामनगरमध्ये झाला. विभागातील महिलांना कला-गुण दाखवण्याची संधी मिळाली याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. आम्हा सर्वासाठी ही नवरात्र खूप खास होती.

– तेजश्री परब, विजेती

First Published on October 12, 2018 2:34 am

Web Title: loksatta 999 unique competition on navratri festival 2018