30 May 2020

News Flash

‘लोकसत्ता’च्या वतीने उद्या कवितेचा ‘अभिजात’ जागर

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात अनोखी काव्यमैफल

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात अनोखी काव्यमैफल

मुंबई : कविता हा स्वभाव असतो. कविता ही वृत्ती असते आणि कविता ही जगण्याच्या संपन्नतेची खूण असते. प्रत्येक कवीला आणि तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकाला या कवितेच्या प्रांतातली मुशाफिरी खूप काही देऊन जाते आणि म्हणूनच ‘लोकसत्ता’च्या वतीने कवितांचा जागर करणारा ‘अभिजात’ हा  कार्यक्रम,  शुक्रवार, दि. २८ रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.

भाव आणि विचार यांचा सुरेख संगम हे साहित्याचे लक्षण. ज्या सहित्यातून अनेक अर्थ झिरपत राहतात, ते अधिक उंचीचे. कविता ही तर त्या अर्थाने साहित्याच्या प्रांतातील अनभिषिक्त  राणी. वाचनाने आणि श्रवणाने प्रत्येकाच्या मनात उमटणारे अनुभूतीचे तरंग कवितेचे न उलगडलेले पदर दाखवतात आणि त्या अनुभवाला कैवल्याचे रूप प्राप्त होते. मराठी साहित्यात आजवर कवींच्या मांदियाळीने जे प्रचंड सर्जन केले आहे, ते मराठी भाषेचे खरेखुरे वैभव आहे.

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘अभिजात’ या उपक्रमाच्या रंगमंचावर नाना पाटेकर, किशोर कदम ‘सौमित्र’, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, स्वानंद किरकिरे, प्रतीक्षा लोणकर या काव्यवंतांना ऐकण्याची ही संधी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी सहा वाजता मिळणार आहे. या कलावंतांच्या बरोबरीनेच साहित्याच्या प्रांतात स्वत:ची खास प्रतिमा तयार करणाऱ्या अशोक नायगावकर, नीरजा आणि मिलिंद जोशी यांसारख्या कवींच्या कविताही रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.

कोऱ्या कोऱ्या कागदावर

असलं जरी छापलं

ओठांवर आल्याखेरीज

गाणं नसतं आपलं

मातीमधे बीजाला

एकच अर्थ कळतो

कोंब फुटून आल्यावर

हिरवा मोक्ष मिळतो

मला सांगा व्हायचं कसं?

मुक्कामाला जायचं कसं?

असे प्रश्न विचारणारे मंगेश पाडगावकर वाचकाला कवितेच्या प्रेमात पडायला भागच पाडतात.

प्रवेशिका कार्यक्रमस्थळी..

‘अभिजात’च्या या अनोख्या उपक्रमात रसिक म्हणून सहभागी होऊन कवितेच्या प्रेमात पडण्याची संधी कोण दवडेल? या कार्यक्रमासाठी प्रवेशमूल्य नसले, तरीही त्यासाठीच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी अर्धा तास आधी उपलब्ध होणार आहेत.

प्रवेशिका कार्यक्रमस्थळी

‘अभिजात’च्या या अनोख्या उपक्रमात रसिक म्हणून सहभागी होऊन कवितेच्या प्रेमात पडण्याची संधी कोण दवडेल? या कार्यक्रमासाठी प्रवेशमूल्य नसले, तरीही त्यासाठीच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी अर्धा तास आधी उपलब्ध होणार आहेत.

प्रायोजक

‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी, मँगो हॉलिडेज आणि रुणवाल ग्रुप हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स, टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा आणि हॉस्पिटलिटी पार्टनर हॉटेल खवय्ये हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 3:35 am

Web Title: loksatta abhijat program on poem held in thane zws 70
Next Stories
1 राज्यातून ‘संपूर्ण मराठी माध्यम’ ही संकल्पनाच हद्दपार
2 पक्ष, संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास विद्यापीठांना मनाई
3 विधानसभा की रेल्वे स्थानक? गर्दीमुळे आमदारांचा उद्विग्न सवाल
Just Now!
X