31 October 2020

News Flash

‘लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’मध्ये आज राज्याच्या प्रगतीवर मंथन

उद्योगपती आनंद महिंद्र यांच्यासह नामवंत विश्लेषक, प्रशासकीय धुरीणांचा सहभाग

उद्योगपती आनंद महिंद्र यांच्यासह नामवंत विश्लेषक, प्रशासकीय धुरीणांचा सहभाग

कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने केलेली कामगिरी-प्रगती आणि भविष्यातील वाटचाल यावर ‘लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या एकदिवसीय परिषदेत आज सोमवार, २६ ऑगस्टला विचारमंथन होत आहे. विख्यात उद्योगपती आनंद महिंद्र, कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामांकित तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.

राज्याच्या अर्थकारणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कृषी, रस्ते-मेट्रो-घरे, विमानतळ, नवी शहरे, उद्योग या प्रमुख क्षेत्रांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने भर दिल्यानंतर आता या साऱ्याचे फलित काय, सद्य:स्थिती काय आणि प्रगतीची दिशा काय, याचा ऊहापोह ‘लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’मध्ये करण्यात येईल. ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ हा नवा उपक्रम सुरू होत असून त्याचे पहिले पर्व आज, सोमवारी होत आहे.

शेतीच्या विकासाचा दर वाढवण्यापासून ते शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा कृषीविषयक सत्रात घेण्यात येईल. राज्याच्या कृषीअर्थकारणापुढील आव्हाने, शेतमालाचे दर आणि बाजारपेठ या विषयांचाही ऊहापोह या सत्रात होईल.

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या भाषणाने या परिषदेचे उद्घाटन होईल. राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषीअर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे हे मान्यवरही या सत्रात सहभागी होतील.

राज्यातील पायाभूत सुविधा विकासाची दिशा आणि त्यासाठीचे वित्तीय व्यवस्थापन, महानगरांचे आणि त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन, मेट्रो रेल्वेचा विस्तार, नवीन शहर-नव्या विमानतळाची उभारणी, पुनर्वसनाचे आव्हान, समृद्धी महामार्ग अशा विविध गोष्टींचा आढावा दुसऱ्या सत्रात घेण्यात येईल. मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि नियोजनतज्ज्ञ विद्याधर फाटक आदी नामवंत यात सहभागी होतील. महाराष्ट्रातील उद्योगांची स्थिती, उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधा, राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणाचे परिणाम यावरील चर्चा उद्योगविषयक चर्चासत्रात होईल.

विख्यात उद्योजक आनंद महिंद्र यांच्याशी होणारा संवाद हे मुख्य आकर्षण असेल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, प्रसिद्ध उद्योजक व ‘जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सव्‍‌र्हिसेस’चे अध्यक्ष दीपक घैसास आणि ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर हे या सत्रात विचार मांडतील.

यांचे सहकार्य

‘लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 1:23 am

Web Title: loksatta advantage maharashtra 2019 mpg 94 3
Next Stories
1 जुन्या सार्वजनिक वाहनांना ‘पॅनिक बटन’चा प्रस्ताव कागदावरच
2 अभियांत्रिकीच्या ६२ हजार जागा रिक्त!
3 ऑनलाइन प्रशिक्षणाला शिक्षकांचा विरोध
Just Now!
X