कररचनेत मोठा बदल घडविणारा वस्तू-सेवाकर (जीएसटी) येत्या १ जुलैपासून देशभर लागू होत असून या करामुळे होणारे बदल, त्याचे फायदे, त्याचे परिणाम आदी पैलूंवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकणारा ‘लोकसत्ता विश्लेषण’ हा कार्यक्रम येत्या मंगळवारी दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ आर्थिक व राजकीय विश्लेषक अजित रानडे व ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे या कार्यक्रमातून वस्तू-सेवाकराचे तपशीलवार विश्लेषण, तसेच श्रोत्यांच्या जीएसटीविषयक शंकांचे निरसनही करतील.

देशातील कररचनेत सुसूत्रता आणण्याच्या हेतूने येत्या १ जुलैपासून वस्तू-सेवाकर लागू होत आहे. दीर्घ काळ चर्चेत असलेला हा कर लागू झाल्यानंतर महागाई वाढेल की स्वस्ताई येईल, हा कर लागू झाल्यानंतर इतर कुठले कर बाद होतील, त्याचे नेमके फायदे काय आहेत, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने त्याचे महत्त्वाचे पैलू कुठले आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास सर्वसामान्य उत्सुक आहेत. त्याचे भान राखूनच ‘लोकसत्ता’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

येत्या मंगळवारी, २० जून रोजी संध्याकाळी सहा वाजता ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये सहभागी होण्याची, आपल्या मनातील वस्तू-सेवाकरविषयक प्रश्न विचारण्याची संधी वाचकांना मिळेल. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • कार्यक्रम स्थळ – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, दादर.
  • कधी – मंगळवार, २० जून, संध्याकाळी सहा वाजता.
  • प्रवेश विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. काही जागा राखीव.