मराठी शाळांवर इंग्रजीचे आक्रमण.. इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढता कल.. ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण.. कोणत्याही मराठी माणसाचे मन विषण्ण करणारे हे मथळे.

पण यात बदल होत आहे. मराठी शाळांकडे पालकांचा कल वाढू लागल्याच्या सुखद बातम्या आता येऊ लागल्या आहेत. हे प्रमाण तुलनेने कमी असेल. चांगल्या मराठी शाळांची संख्या कदाचित कमी असेल. परंतु, गेल्या काही वर्षांत त्यात हळुहळू वाढ होताना दिसत आहे. यातून दिसतो तो पालकांचा मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेच्या योग्यतेवरील विश्वास आणि प्रवाहाविरोधात जाण्याचे धाडस. असेच ‘धैर्य’ दाखविणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांचे मनोगत सोबत प्रसिद्ध करीत आहोत.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा

मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देऊन त्यांच्या मनाचा, उत्तम भवितव्याचा विचार करणारे असे पालक आज समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करीत आहेत. मराठीच्या नावाने केवळ अभिमान गीते गात हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा हे पालक जे करीत आहेत ते नक्कीच अधिक मोलाचे आहे.. आणि म्हणूनच आजच्या शैक्षणिक आंग्लाईच्या काळात असे करणाऱ्या पालकांच्या या विचारकथा समाजासमोर येणे आवश्यक आहे. कारण अखेर अशा पालकांना नैतिक बळ देतानाच, त्यांचे विचारविश्व एकमेकांशी जोडले जाणेही महत्त्वाचे आहे. त्यात अधिक सकारात्मकता आहे.

आपण असे पालक असाल, तर आपणास आपल्या मुलास मराठी शाळेत का घालावेसे वाटले, तसेच त्या शाळेचा अनुभव आम्हांस जरूर कळवा. सोबत आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, तसेच मराठी शाळेचे नाव आणि त्या शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुला-मुलीसोबतचे छायाचित्रही पाठवा. यातील निवडक पत्रांना ‘लोकसत्ता’तून प्रसिद्धी दिली जाईल.

ई-मेलच्या विषयामध्ये – माझी शाळा मराठीसाठी असे आवर्जून नमूद करा.

ई-मेल loksatta@expressindia.com