26 September 2020

News Flash

‘मार्ग यशाचा’!

हा परिसंवाद एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि रोबोमेट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

रवींद्र नाटय़ मंदिर येथे उद्या परिसंवाद

अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे देणार

करिअर निवडीचा नेमका निकष कोणता, हे जाणून घेण्यासाठी दहावी-बारावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कमालीचे उत्सुक असतात. दहावी-बारावीनंतर नेमका कुठला अभ्यासक्रम निवडावा आणि त्या अभ्यासक्रमाचे नेमके स्वरूप काय आहे आणि त्यातील विविध करिअरसंधी कोणत्या? अशा प्रश्नांनी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात ठाण मांडलेले असते.

अशा करिअरविषयक अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला येत्या रविवारी, २७ डिसेंबर रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या परिसंवादात नक्कीच मिळतील. हा परिसंवाद सर्वासाठी खुला आहे.

हा परिसंवाद एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि रोबोमेट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. परिसंवादाच्या पहिल्या सत्रात ‘दहावी-बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा?’ याविषयी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधतील, तसेच अभ्यासाची तंत्रेही कथन करतील. परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात ‘वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..’ या विषयावर परळ येथील केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे मार्गदर्शन करणार आहेत.

अखेरच्या सत्रात ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर अभियांत्रिकीतील विविध संधींची तसेच दहावी-बारावीनंतर विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख करून देणार आहेत.

कधी? – रविवार, २७ डिसेंबर सकाळी दहा वाजता.

कुठे? – रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी.

मार्गदर्शक व त्यांचे विषय –

वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.

दहावी-बारावीनंतर विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख

विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक.

परीक्षेच्या तणावाचा सामना कसा कराल?

डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 4:26 am

Web Title: loksatta arranging a career counseling program
टॅग Loksatta,Program
Next Stories
1 नजरेतून काळजाचा ठाव घेणारी अभिनेत्री
2 बलात्कार म्हणजे स्त्रीच्या जगण्याच्या अधिकारावरच घाला
3 मुंबईच्या तापमानाची गाडी पुन्हा रुळावर
Just Now!
X