पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा अर्थ खऱ्या अर्थाने उलगडू लागेल तो नव्या आर्थिक वर्षांत. या आठवडय़ानंतर या वर्षांला सुरुवात होत असून, त्याच सुमारास सर्वसामान्यांसाठीचा गुंतवणुकीचा माहितीमार्ग खुला होणार आहे..  अर्थकारणाचे परब्रह्म उलगडून दाखविणारे ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ लवकरच म्हणजे येत्या २८ मार्च रोजी बाजारात येत आहे.
प्राप्तिकराची मूळ मर्यादा विचलित न झाल्याने नाराज असलेल्या पगारदारांना करवजावटीचे अन्य मार्ग उलगडून दाखविणारा यंदाचा हा गुंतवणूक विशेषांक असून, ‘अर्थब्रह्म’च्या या दुसऱ्या अंकात केंद्र सरकारने घोषित केलेल्या नव्या बचत योजनांचा सांगोपांग आढावा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पारंपरिक गुंतवणूक पर्यायांची अधिक सुलभतेने मांडणी करण्यात आली असून, भांडवली बाजार, वायदे बाजार, विमा, स्थावर मालमत्ता अशा सर्वागाने या विशेषांकात ठळक आकडेवारीसह ऊहापोह करण्यात आला आहे. निवृत्तिवेतन, सोने, ऑनलाइन ट्रेडिंग, क्रेडिट रेटिंग असे सारे तुमच्या-आमच्या खिशाशी संबंधित आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या लेखणीतून उतरलेले लेख हे या विशेषांकाचे खास वैशिष्टय़ आहे. या ‘सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत’ विशेष संग्राह्य़ अंकाचे सहप्रायोजक ‘नातू परांजपे – इशान ड्रिम बिल्ड प्रा. लि.’ आणि ‘कोटक म्युच्युअल फंड’ हे आहेत.