01 October 2020

News Flash

कंपनी समभाग, म्युच्युअल फंड की स्थिर उत्पन्न?

महागाईवर मात करणाऱ्या परताव्याचे आज वाशीमध्ये विश्लेषण

महागाईवर मात करणाऱ्या परताव्याचे आज वाशीमध्ये विश्लेषण

भांडवली बाजारातील सूचिबद्ध समभाग, म्युच्युअल फंडांच्या हजारो योजना की मुदत ठेवी, रोखे आदी स्थिर उत्पन्न देणारे पर्याय विद्यमान महागाईवर आकर्षक परताव्याच्या दृष्टीने योग्य ठरू शकतात, याबाबतचे सविस्तर विवेचन व मार्गदर्शन नवी मुंबईकरांना रविवारी मिळणार आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ या गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक नियोजनकार याबाबत भाष्य करणार आहेत.

रविवार २ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता साहित्य मंदिर सभागृह, सेक्टर ६, वाशी येथे होणाऱ्या या कार्यक्रमात गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यावरील कर व बचत तसेच परतावा याबाबतचे सखोल मार्गदर्शन होईल. या वेळी तज्ज्ञांना प्रश्न विचारून उपस्थितांना गुंतवणूकविषयक शंकांचे समाधान करून घेता येणार आहे.

‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे सनदी लेखापाल तृप्ती राणे या आपली मते मांडतील. गुंतवणुकीचे पर्याय तसेच वयोगटानुसार वेगवेगळ्या टप्प्यांतील गुंतवणुकीचे सोदाहरण त्या या वेळी स्पष्टीकरण देतील.

‘म्युच्युअल फंड : गुंतवणूक फायद्याची’ यावर प्रकाश टाकताना नियोजनकार सुयोग काळे हे फंडांची कार्यशैली, त्याचे प्रकार, त्यावरील कर तसेच परतावा तसेच त्याची भांडवली बाजाराशी असलेली सांगड स्पष्ट करतील.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

(Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 12:41 am

Web Title: loksatta arthbhan
Next Stories
1 वाढीव वेतनलाभाचे गुंतवणुकीतून नियोजन करण्याचे मार्गदर्शन
2 चार वर्षांत साडेपाच लाख रोजगार
3 मराठा आरक्षण खासगी उद्योगांतही?
Just Now!
X