करोना-टाळेबंदीच्या अभूतपूर्व संकटाने उत्पन्नाबरोबरच खर्चावरही मर्यादा आल्या आहेत. सामाजिक निर्बंधाची सवय अंगवळणी पडत असतानाच बचत आणि गुंतवणुकीचे गणितही याच दरम्यान घराघरांत मांडले जात आहे. सद्य:स्थिती आणि नजीकच्या भविष्याच्या दृष्टीने अर्थसंकट पेलण्यासाठी नेमके  गुंतवणूक नियोजन कसे हवे, याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थसल्ला मंचा’वर उपलब्ध होत आहे.

सनदी लेखाकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे या येत्या मंगळवारी, १५ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता वेबसंवादातून वाचक, गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करतील.

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक त्यांच्या मार्चमधील तळातून आता बाहेर आले आहेत. तर सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूने याच कालावधीत दरचकाकी नोंदवली आहे. या स्थितीत काहीसे नकारात्मक गुंतवणूक ठरलेल्या म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता क्षेत्राबाबत काय गुंतवणूक धोरण असावे, याबाबतचे मार्गदर्शन तृप्ती राणे या वेबसंवादातून करतील.

गेल्या पाच महिन्यांत अस्थिर बनलेल्या अर्थवातावरणात, खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळवत कुटुंबाचे आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या वर्तनात करावयाच्या बदलांचा वेधही या आभासी संवाद माध्यमातून घेतला जाईल.

सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक

https://tiny.cc/LS_Arthasalla_15Sept