पाल्र्यात उद्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शन

नोटबंदीनंतर गुंतवणुकीची दिशा कशी असावी? कोणते पर्याय अनुसरले जावेत? करविषयक तिढा कसा सोडवावा? आदींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मुंबईकरांसाठी उपलब्ध झाला आहे.

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा गुंतवणूक मार्गदर्शन कार्यक्रम येत्या गुरुवारी, २२ डिसेंबर २०१६ रोजी होत आहे. सायंकाळी ६ वाजता लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर, राम मंदिर मार्ग, विलेपार्ले (पूर्व) येथे हे पर्व पार पडेल.

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. यासाठी निमंत्रितांकरिता काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

नोटबंदी आणि गुंतवणूक हा विषय अधिक सुटसुटीत स्वरूपात विशद करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या या व्यासपीठावरून तज्ज्ञ आर्थिक जाणकार उपस्थितांना मार्गदर्शन करतील. ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे’ अर्थसल्लागार सुयोग काळे हे सांगतील. फंडातील गुंतवणुकीबाबत काय लक्षात घ्यावे, हेही ते नमूद करतील. तर ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे सनदी लेखाकार तृप्ती राणे या गुंतवणुकीचे विविध पर्याय सांगतील. नोटाबंदीनंतरचे अर्थनियोजनही त्या मांडतील.

  • कधी?

गुरुवार, २२ डिसेंबर २०१६

सायंकाळी ६ वाजता

  • कुठे?

लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर, राम मंदिर मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई</p>

  • अर्थनियोजनाचा श्रीगणेशा : तृप्ती राणे
  • म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे : सुयोग काळे