News Flash

लघुउद्योगाच्या क्षमता आणि आव्हानांचा चर्चात्मक वेध

दोन दिवसांच्या परिषदेत विविध सहा चर्चासत्रांमधून तज्ज्ञांच्या सहभागाने विचारमंथन घडणार आहे.

‘लोकसत्ता-बदलता महाराष्ट्र

‘लोकसत्ता-बदलता महाराष्ट्र’ परिसंवादाचे विक्रम लिमये यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

उद्योगदृष्टय़ा महाराष्ट्राला अग्रस्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या लघू व मध्यम उद्योगाच्या क्षमता आणि या क्षेत्राच्या वाढीला अडसर ठरणाऱ्या आव्हानांचा वेध ‘लोकसत्ता : बदलता महाराष्ट्र’ उपक्रमातून घेतला जाणार आहे. या दोन दिवसांच्या परिसंवादाची सुरुवात सोमवारी सकाळी ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज-एनएसई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये यांच्या उद्घाटकीय भाषणाने होणार आहे.

‘केसरी प्रस्तुत व ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ व ‘एनकेजीएसबी बँक’ या परिसंवादाचे सहप्रायोजक आहेत. ही परिषद येत्या ११ व १२ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. या परिषदेचा समारोप ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्शिअल होल्डिंग्ज’चे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी यांच्या नव-उद्योजकांच्या पिढीला मार्गदर्शक ठरणाऱ्या भाषणाने होणार आहे.

लघुउद्योगाला भेडसावणाऱ्या वित्तपुरवठय़ाच्या समस्येवर कसा मार्ग काढता येईल व त्यासाठी स्रोत कसे उपलब्ध करून घेता येईल, या विषयावरील चर्चासत्राने ही परिषद सुरू होईल. त्याचबरोबर उत्पादनाचे ब्रँडिंग व बाजारपेठ, कुशल रोजगार व तंत्रज्ञानाची उपलब्धतता, लघुउद्योगांसाठीची नियमावली, मंजुऱ्या-परवान्यांचे अडसर, त्याचप्रमाणे लघुउद्योगासाठीच्या विविध प्रोत्साहन योजना अशा सर्व पैलूंचा दोन दिवसांच्या परिषदेत विविध सहा चर्चासत्रांमधून तज्ज्ञांच्या सहभागाने विचारमंथन घडणार आहे.

चर्चासत्र आणि वक्ते

’वित्तपुरवठा समस्या व स्रोत

सहभाग : अभय बोंगिरवार (कार्यकारी संचालक, आयडीबीआय बँक), कुसुम बाळसराफ (प्रकल्प महाव्यवस्थापिका, माविम), डॉ. विश्वास पानसे (एनपीए सल्लागार)

’नाममुद्रा, बौद्धिक संपदा, बाजारपेठ

सहभाग : प्रा. डॉ. मृदुला बेळे (बौद्धिक संपदा व पेटंट सल्लागार), मीनल मोहाडीकर (उपाध्यक्षा, एमईडीसी), अ‍ॅड. मृणालिनी वारूंजीकर (ग्राहक कायदा तज्ज्ञ)

’कुशल रोजगार व तंत्रज्ञान उपलब्धता

सहभाग : हेमंत देशपांडे (कौशल्य विकास मार्गदर्शक), घनश्याम सोमण (प्राचार्य, डॉन बॉस्को मेरिटाइम अकादमी)

(कौशल्य विकासातून रोजगारनिर्मिती : दीपक कपूर (मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण)

’प्रोत्साहनपूरक योजना व उद्योगानुकूलता

सहभाग : संजय सेठी (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी), डॉ. प्रदीप बावडेकर (व्यवस्थापकीय संचालक, मिटकॉन), समीर जोशी (मुख्य कार्यकारी अधिकारी, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट)

’नियमावली : बंधन की व्यवसायसुलभता

सहभाग : सचिन म्हात्रे (उपाध्यक्ष, विदेश व्यापार समिती – टिसा), मोहन गुरनानी (अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र), रवींद्र सोनावणे (अध्यक्ष, लघुउद्योग भारती – महाराष्ट्र)

छोटे ते मोठे उद्योग – वाढीचे संक्रमण : शंतनू भडकमकर (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2017 2:21 am

Web Title: loksatta badalta maharashtra seminar inaugurated tomorrow by vikram limaye
Next Stories
1 पियानो वादकाची आत्महत्या
2 VIDEO: वाशी रेल्वे स्थानकाजवळून ३ वर्षांच्या मुलाचे अपहरण
3 नारायण राणे यांच्याकडे काँग्रेसचे दुर्लक्ष
Just Now!
X