विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचे कठीण काम ब्लॉग बेंचर्सच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ करणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ एक प्रकारे ‘लिहिते व्हा’ असाच संदेश देत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रित झालेली मुले बाहेर पडून अवांतर वाचनाला प्रवृत्त होतील. त्यांची लिहिण्याची कला विकसित होईल. मुले लिहिते झाल्याने त्यांचे वाचनही वाढेल. देश-विदेशातील चालू घडामोडींच्या वाचनाबरोबरच त्याचा अन्वयार्थ लावणे त्यांना सोपे जाईल. या उपक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांना या स्पर्धेचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न विभागात करीत आहोत. आमच्याकडेही विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचे काही प्रयत्न आम्ही करतो. राज्यशास्त्र विषय असल्याने विधिमंडळाचे एक मॉडेल बनवून एकाला मंत्री, विरोधी पक्ष नेता, आमदार वगैरे पदे देऊन त्यांना ते संवाद लिहायला लावतो. ब्लॉग बेंचर्स या उपक्रमाच्या माध्यमातूनही संवाद साधण्याबरोबरच वाचणे, लिहिणे, विचार करणे यांसारख्या गुणांचा विकास होईल.
 डॉ. मोहन काशीकर (विभागप्रमुख, पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ)

स्पध्रेत सहभागी होण्यासाठी..
’स्पध्रेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
www. loksatta.com /blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पध्रेत सहभागी होऊ शकतात.
’ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
’यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
’‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल. अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’