आंतरराष्ट्रीय संबंधांवर अधिकारवाणीने भाष्य करणाऱ्यांमध्ये अभ्यासू अधिकारी म्हणून शिवशंकर मेनन यांचे नाव अग्रक्रमाने घेण्यात येते. मुळात दृष्टिकोन अभ्यासू असला तर त्या अभ्यासास व्यावहारिक शहाणपणाची जोड मिळते. मेनन यांना ती लाभलेली आहे. म्हणून अमेरिकेची तेल स्वयंपूर्णता आणि भारताची सुरक्षा यांच्या संदर्भात त्यांनी केलेली मांडणी अलीकडच्या काळात प्रत्ययाला येऊ लागली आहे. शिवशंकर मेनन यांच्या परराष्ट्रविषयक व देशांतर्गत सुरक्षेवरील धोरणावर ‘मननीय मेनन’ या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

पाकिस्तानला दूषणे देणे हे अधिक सोपे आणि आकर्षक आहे. या गंभीर प्रश्नांना हात घालावयाचा तर ते दीर्घकालीन धोरणात्मक काम आहे आणि त्यात तितकी प्रसिद्धीही नाही. त्यापेक्षा अन्यांना बोल लावण्याने प्रसिद्धीचीही हमी आणि परत राष्ट्रवादाचा अंगार वगैरे फुलवण्याचीही सोय असते. म्हणूनच देशास धोका असलाच तर तो बाहय़ नाही तर अंतर्गत आहे. शिवशंकर मेनन यांचे हे प्रतिपादन या अग्रलेखात मांडून त्यांच्या अंतर्गत सुरक्षेवरील विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना याच अग्रलेखावर आपले मत मांडायचे आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

स्पर्धेतील सहभागासाठी  विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenc या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ loksatta.blogbenchers@expressindia.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.