News Flash

नागपूरची श्रेया तिवारी आणि नांदेडचा संघशील भद्रे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते

लष्कराकडून विशेषाधिकारांच्या नावाखाली माणसे मारली जात असतील

लष्कराकडून विशेषाधिकारांच्या नावाखाली माणसे मारली जात असतील तर अशा जवानांची खुनाच्या आरोपाखाली चौकशी व्हायलाच हवी, अशी भूमिका मांडणाऱ्या तसेच ‘आफ्स्पा’ सारख्या कायद्याचा अंमलही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्याने या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या ‘लष्करी दडपशाहीला आळा’ या अग्रलेखावर व्यक्त होणारी नागपूरच्या ‘एसएफएस महाविद्यालया’ची विद्यार्थिनी श्रेया तिवारी ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाची विजेती ठरली. तर, या स्पर्धेत नांदेडच्या ‘ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर कोटग्याळ, मुखेड’चा विद्यार्थी संघशील भद्रे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

देशातील अशांत क्षेत्रात लष्कराला दिलेल्या विशेषाधिकाराचे उल्लंघन होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्हच असल्याची भूमिका ‘लष्करी दडपशाहीला आळा’ या अग्रलेखात मांडण्यात आली होती. तसेच, लष्करी वर्दी म्हणजे कृष्णकृत्ये झाकण्याची मुभा नव्हे, कारण लष्कर हे माणसांचे असते आणि माणसे चुकतात त्याप्रमाणे लष्करही चुकू शकते. त्यामुळे हे एकदा मान्य केले की, सर्वसामान्यांना ज्याप्रमाणे चुकीसाठी शिक्षा भोगावी लागते त्याप्रमाणे ती लष्करासही भोगावी लागण्यात काही गैर नाही. अशी भूमिका घेणाऱ्या या अग्रलेखावर श्रेया व संघशील यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. श्रेयाला सात हजार आणि प्रमाणपत्र तर संघशीलला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते.  पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:28 am

Web Title: loksatta blog benchers winner 21
Next Stories
1 Bjp and Shiv Sena alliance: भाजपला शह देण्यासाठी सेनेची भीमशक्तीशी नवी जवळीक!
2 ‘लोढा’च्या संचालकांविरूध्द भाडेकरू न्यायालयात!
3 ‘आर्थिक सर्वेक्षणा’ची ‘आधार’शी सांगड घाला
Just Now!
X