News Flash

नांदेडचा प्रसाद मुगटकर आणि पुण्याचा श्रीकांत येरूळे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते

पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम’च्या श्रीकांत येरुळे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा कौल भावनांच्या आधारे दिल्यावर, असा भावना भडकावणारा प्रचार अप्रामाणिक असतो आणि त्यास मिळणारे यशही तात्पुरते असते; परंतु त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. ‘ब्रेग्झिट’मुळे ग्रेट युरोपीय संघावरही प्रश्नचिन्ह लागेल असे मत मांडणाऱ्या ‘अंतारंभ’ या अग्रलेखावर आपले मत मांडणारा नांदेडच्या ‘एमजीएम महाविद्यालयाचा’चा प्रसाद मुगटकर ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर,  पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम’च्या श्रीकांत येरुळे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

युरोपीय महासंघातून बाहेर पडावे किंवा नाही यावर जनमताचा कौल घेण्याची ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांची खेळी चांगलीच अंगाशी आली. युरोपीय संघाचा बागुलबोवा उभा करणाऱ्यांच्या मागे जात बहुसंख्य ब्रिटिश जनतेने घटस्फोटाच्या बाजूने आपला कौल दिला. सर्व सामान्य जनतेस आर्थिक समीकरणे उमजत नाहीत. या घटस्फोटाचे परिणाम आर्थिक असणार आहेत. यातील चिंतेची बाब म्हणजे ब्रिटनपाठोपाठ  ग्रीस किंवा स्कॉटलंड आदी देशही घटस्फोटाची भाषा करू शकतात, असे स्पष्ट मत मांडणाऱ्या ‘अंतारंभ’ या अग्रलेखावर प्रसाद व श्रीकांत यांनी आपले मत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. प्रसादला सात हजार आणि प्रमाणपत्र तर श्रीकांतला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

महाविद्यालयीन युवाशक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे.  विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:09 am

Web Title: loksatta blog benchers winners 4
Next Stories
1 रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदार दिपेन शहा याला अटक
2 पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी
3 कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा
Just Now!
X