मराठी नाटक आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकसत्ता बॉक्सऑफिस’च्या माध्यमातून काही वेगळे उपक्रम ‘लोकसत्ता’ने सुरू केले आहेत. याच ‘लोकसत्ता बॉक्स ऑफिस’ आणि ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ या नामांकित नाटय़निर्मिती संस्थेच्या सहकार्याने ठाण्यात डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे ‘समुद्र’ नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘लोकसत्ता बॉक्स ऑफिस’च्या वतीने रविवारी, २२ मार्च रोजी संध्याकाळी ४.३० वाजता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘समुद्र’ नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. मिलिंद बोकील लिखित, अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी यांची मुख्य भूमिका असलेले ‘समुद्र’ हे नाटक ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ची ५० वी कलाकृती आहे. या नाटकाला यंदाच्या विविध पुरस्कार सोहळ्यात १० नामांकने मिळाली आहेत.
‘केसरी’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता बॉक्स ऑफिस’ आणि ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘लागू बंधू’ यांच्या सहकार्याने हा प्रयोग रंगणार आहे. हा प्रयोग पाहू इच्छिणाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता’च्या ‘रविवार वृत्तांत’ पुरवणीत कूपन छापले जाणार आहे. सदर कूपन  घेऊन काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात येणाऱ्यांना तिकीटावर १०० रुपये सवलत देण्यात येणार आहे. एका कुपनावर एका तिकाटासाठी ही सवलत देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वाने हे प्रवेश देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी ‘ओम श्री साई कृपा कन्स्ट्रक्शन’ आणि ‘इन्स्टा स्कल्प्ट’ हे ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ आहेत. तरी जास्तीत जास्त नाटय़रसिकांनी या ‘समुद्र’ नाटय़प्रयोगाचा लाभ घ्यावा.