24 February 2021

News Flash

‘लोकसत्ता.कॉम’च्या वृत्ताची दखल, त्या व्हिडिओसंदर्भात पोलिसांचे कारवाईचे आदेश

ठाणे रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत

कळवा स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका मुलाने धावत्या लोकलमधून प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याची बातमी लोकसत्ता.कॉमने सीसीटीव्ही फुटेजसह दिली होती. या बातमीची दखल घेत मध्य रेल्वेच्या पोलिसांनी घेतली आहे. मध्ये रल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी करण्यास सांगितले आहे. ठाणे रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मोबाइल हिसकावल्यानंतर धावत्या लोकलमधून प्रवाशाने उडी मारली होती. यामध्ये तरूणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभिर्याने घेतले आहे.

@rpfcrbb Kindly look into this matter.

— Central Railway RPF (@rpfcr) August 30, 2018

कळव्यामध्ये १९ ऑगस्ट रोजी धावत्या मोबइलमधून मोबइल खेचलेला व्हिडीओ समोर आला आहे. रात्रीच्या १२:५३ मिनीटाच्या कल्याणकडे जाणाऱ्या गाडीमध्ये हा प्रकार घडला आहे. कळवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील हा प्रकार आहे. प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका मुलाने धावत्या लोकलमधून प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील तरुणाने दरवाज्यात उभ्या असेल्या प्रवाशाचा मोबइल खेचला. त्यानंतर त्या प्रवाशाने लगेच ट्रेनमधून उडी मारल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीच्या किमान १० तक्रारी दाखल होतात. २०१७ या पूर्ण वर्षात १८ हजार मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मोबाइल चोरीचे १०० गुन्हे रोज दाखल होतात अशी माहिती दोन महिन्यापूर्वी GRP नी दिली होती . जे प्रवासी त्यांचा मोबाइल मिळण्याची आशाच सोडून देतात ते पोलिसात तक्रार द्यायला येत नाहीत. पोलिसात तक्रार न देणाऱ्या प्रवाशांचेही प्रमाण बरेच आहे असेही त्यांनी म्हटले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 6:08 pm

Web Title: loksatta com news impact police asks for inquiry
Next Stories
1 VIDEO : ‘स्पेशल २६’ स्टाईलने चोरी करणाऱ्या टोळीला ठाण्यात अटक
2 कळव्यात ‘फटका गँग’चा प्रताप, मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
3 धक्कादायक! नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने पत्नीवर केला बलात्कार
Just Now!
X