01 March 2021

News Flash

अत्याचार करून बालिकेची हत्या

आरोपीला अटक, गुन्ह्य़ाची कबुली

प्रतिकात्मक छायाचित्र

आरोपीला अटक, गुन्ह्य़ाची कबुली

जुहूच्या एका घरातून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बालिकेचा मृतदेह शनिवारी त्याच परिसरातील गटारात सापडल्याने खळबळ उडाली. अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली देवेंद्र वडीवेल या आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी वडीवेल हा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा आहे. त्याच्याविरोधात बाललंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार आणि हत्येचा गुन्हा नोंदवल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिले.

या बालिकेला तिच्या आईने दुकानावर काही वस्तू आणण्यासाठी पाठवले होते. ती बराच वेळ न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. अखेर कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या बालिकेचा मृतदेह शनिवारी सापडल्यानंतर तिचे कुटुंबीय आणि रहिवाशांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. संतप्त जमाव पांगवण्यास पोलिसांना चार तास लागले. परंतु अतिरिक्त आयुक्त शर्मा यांनी जमावाची समजूत काढली. आरोपी वडीवेल अशाच प्रकारच्या गुन्ह्य़ात सात वर्षांची शिक्षा भोगून अलीकडेच वस्तीत परतला होता. बालिकेची हत्या करून मृतदेह दडवल्याचे ठिकाण त्याने पोलिसांना दाखवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 1:21 am

Web Title: loksatta crime news 171
Next Stories
1 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णखरेदीचा उत्साह 
2 १४ प्रज्ञावंत तेजांकितांचा सन्मान सोहळा..
3 धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या
Just Now!
X